Home /News /entertainment /

Akshay Kumar: 'मग मी काय करू?' मॅडीच्या वक्तव्यावर अक्षय कुमार झाला रिऍक्ट!

Akshay Kumar: 'मग मी काय करू?' मॅडीच्या वक्तव्यावर अक्षय कुमार झाला रिऍक्ट!

(Akshay Kumar R Madhvan) अक्षय कुमार आणि आर माधवन यांच्यात एक क्रिया-प्रतिक्रियांचा संवाद रंगताना दिसत आहे.

  मुंबई 2 जुलै: अभिनेता आर माधवनची (R Madhvan) मुख्य भूमिका असलेला (Rocketry: the nambi effect) रॉकेटरी: द नंबी इफेक्ट हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटातून प्रेक्षकांचा लाडका मॅडी दिग्दर्शकाच्या रूपात सुद्धा पहिल्यांदाच समोर आला. रिलीज झाल्या झाल्या लगेचच या चित्रपटाबद्दल बऱ्याच ठिकाणाहून कौतुकाचे सूर ऐकू येत आहेत. आर माधवनने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये या चित्रपटातील भूमिकेसाठी काय तयारी केली हे सांगितलं. तसंच बॉलिवूडमधील रिमेक आणि इतर अनेक विषयांवर तो व्यक्त झाला. त्यादरम्यान त्याने बॉलिवूडमधल्या खिलाडी अभिनेत्यावर निशाणा ठेवत अप्रत्यक्षपणे एक वक्तव्य केलं, ज्यावर खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar and R Madhvan) सुद्धा रिऍक्ट झाला आहे. आर माधवनच्या मते प्रेक्षक पुष्प, RRR अशा जास्त काळ घेऊन केलेल्या फिल्म्स बघणं पसंत करतात. तो असं म्हणतो, “साऊथच्या ज्या फिल्म्स चालल्या त्यात अभिनेत्यांनी तगडं काम केलं आहे. अल्लू अर्जुनचं उदाहरण घेतलं तर त्याने पुष्पाच्या रोलसाठी बरीच मेहनत घेतली. कलाकारांची सिनेमासाठी जी कमिटमेंट आहे जिकडे एखादा चित्रपट बनवायला तीन-चार महिने नाही तर एक वर्ष लागतं असे चित्रपट प्रेक्षक जास्त पसंत करत आहेत. पुष्पा, KGF, RRR यांनी बॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षा जास्त कामे केली कारण त्या मोठ्या स्केलवर बनवलेल्या फिल्म्स होत्या आणि त्यांचं फॅन फॉलोईंग हे जगभरात होतं. पण याचा अर्थ बॉलिवूडमध्ये फिल्म्स चालल्या नाहीत असं नाही. गंगुबाई काठियावाडी, काश्मीर फाईल्स अशा सिनेमांनी थोडीथोडकी नव्हे तर चांगली कमाई केली. कोविड नन्तर लोकांचा पेशन्स कमी झाल्याने सुद्धा चित्रपटाला पुढे नेणारं कथानक नसेल तर प्रेक्षकांचा इंटरेस्ट निघून जात होता.पण ही रोज बदलणारी गणितं आहेत यावर शिक्कामोर्तब करून राहणं बरोबर ठरणार नाही.” यामध्ये त्याने (R Madhvan on Akshay Kumar's working style) नाव न घेता अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. अक्षय एकामागे एक सतत फिल्म्स करतो आणि त्याच्या फिल्म्सच शूट हे तीन-चार महिन्यात संपून जातं. या वक्तव्यावर त्याची प्रतिक्रिया विचारल्यावर तो म्हणतो, “काय बोलू मी यावर? मी काय करू? माझ्या सिनेमाचं शूट संपून जातं लवकर त्याला मी काय करू शकनार आहे?
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  दिग्दर्शक येऊन सांगतो की बाबा तुझं काम झालं आहे तू घरी जाऊ शकतोस तर मी त्याच्याशी भांडू? मी दिग्दर्शकावर चिडू? माझं काम लवकर संपतं यात मी काय सांगू शकतो हेच मला उमगत नाही”. अशा शब्दात अक्षय आपली बाजू मांडताना दिसतो. अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटाला कॉंट्रोव्हर्सीमुळे जबर फटका बसला होता. हे ही वाचा- Koffee With Karan: आलिया, रणवीरची कॉफी काऊचवर हजेरी, विकी-कतरिना नसणार का KWK चा भाग?
  अक्षय रक्षाबंधन चित्रपटाउन लवकरच पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सुद्धा अक्षयची बाजू घेत मत मांडलं होतं. सम्राट पृथ्वीराज च्या निराशेनंतर येणार चित्रपट अक्षयसाठी फळतो का हे पाहून महत्त्वाचं असेल.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood actor, Bollywood News

  पुढील बातम्या