Home /News /entertainment /

"मी खोटं कसं बोलू पण...", बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत अक्षय कुमारने VIDEO तून केला खुलासा

"मी खोटं कसं बोलू पण...", बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत अक्षय कुमारने VIDEO तून केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच जेव्हा NCB च्या यादीत A नाव आलं होतं, तेव्हा अक्षय कुमारच्या (akshay kumar) नावाची चर्चा सोशल मीडियावर झाली होती.

    मुंबई, 03 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स विभागाने ड्रग्ज अँगलने तपास सुरू केला आणि बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली. काही जणांना अटक झाली, काही जणांची चौकशी सुरू आहे तर आणखी काही जण एनसीबीच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वीच एनसीबीच्या यादीत A नाव असल्याचं समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) चर्चा सुरू झाली होती. दरम्यान आता खुद्द अक्षय कुमारनेही बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमारने पहिल्यांदाच सुशांत सिंह राजपूत आणि बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.  बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा संबंध आहे, तो नाकारता येत नाही. मात्र याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्रीला टार्गेट करावा असं नाही, असं अक्षय म्हणाला आहे. अक्षय म्हणाला, "आज खूप जड मनाने तुमच्याशी बोलत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तुम्हाला सांगण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी मनात आहेत. मात्र सगळीकडे इतकी नकारात्मकता आहे, त्यामुळे काय बोलू, कुणाशी बोलू आणि किती बोलू हेच समजत नाही आहे. भले स्टार आम्हाला म्हटलं जातं असलं तरी बॉलिवूडला तुम्ही तुमच्या प्रेमाने बनवलं आहे. आपण फक्त एक इंडस्ट्री नाही आहोत. आपण फिल्मच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि मूल्यं जगाच्या कानाकोपऱ्याता पोहोचवली आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या देशात जनतेच्या भावनांचा विषय येतो तेव्हा आपण फिल्मच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न केला, हे तुम्हालाही जाणवलं असेल. मग तो अँग्री मॅनवाला आक्रोश असो किंवा भ्रष्टचार, गरीबी, बेरोजगारी. प्रत्येक विषयाला सिनेमाने आपल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर आज तुम्ही संतप्त आहात तर आमच्याही तशात भावना आहेत" हे वाचा - सुशांतची आत्महत्याच; AIIMS च्या रिपोर्टनंतर बहीण श्वेता किर्ती सिंह म्हणाली... अक्षय म्हणाला, "सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यामुळे तुम्हाला जितक्या वेदना झाल्या तितक्या वेदना आम्हालाही झाल्या. फिल्म इंडस्ट्रीतील अशा अनेक गोष्टींकडे आज आमचं लक्ष वळवलं जिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं सध्या ड्रग्जबाबत चर्चा सुरू आहे. मी याबाबत कसं खोटं बोलू की बॉलिवूडमध्ये ड्रग्ज नाहीच, जरूर आहे. जसं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असतं तसंच. मात्र प्रत्येक इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीचा याच्याशी संबंध असणं गरजेचं नाही. ड्रग्ज प्रकरण ही कायदेशीर बाब आहे आणि आपल्या तपास यंत्रणा जो काही तपास करतील तो योग्य असेल आणि या तपासात फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्ती तपास यंत्रणेला पूर्णपणे मदत करेल, असा मला विश्वास आहे. पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो. असं नका करू. पूर्ण इंडस्ट्रीला वाईट म्हणू नका. हे चुकीचं आहे ना"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood

    पुढील बातम्या