मुंबई, 29 जानेवारी : अक्षय कुमारचा विनोदी अंदाज सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये नेहमीच पाहायला मिळतो. त्याचे को-स्टार सुद्धा त्याच्या मस्करी आणि विनोदाचे किस्से प्रमोशन दरम्यान अनेकदा शेअर करताना दिसतात. पण यावेळी फोटोग्राफर्सना सुद्धा याचा अनुभव आला. अक्षय कुमारनं फोटोग्राफर्सना पाहून असं काही केलं की त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल. अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अक्षय सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. मंगळवारी संध्याकाळी अक्षय सिनेमाचं शूटिंग संपवून परताना त्याला फोटोग्राफर्सनी घेरलं. यावेळी अक्षय कुमारनं त्यांना असा चकवा दिला की फोटोग्राफर्सना सुद्धा हसू आवरलं नाही. जेटीच्या किनाऱ्यावरून परतताना कॅमेरामन्सनी त्याला घेरलं अक्षय सुरुवातीला हळूहळू चालत होता पण अचानक त्यानं असं भासवलं की तो आता धावणार आहे. त्याचा हा अवतार बघून कॅमेरामन घाबरले. पण नंतर अक्षय मोठमोठ्यानं हसू लागला. त्याचा हा प्रॅन्क व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सलमानच्या गोव्यात येण्यावर बंदी? सेल्फी प्रकरण दबंग खानला भोवणार
अक्षकची प्रॅन्क करण्याची सवय बॉलिवूडमधील जवळजवळ सर्वच कलाकारांना माहित आहे. अनेकांनी त्याचा अनुभवही घेतला आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याच्या ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात अक्षय करिना कपूरसोबत प्रॅन्क करताना दिसला होता. शूटिंग दरम्यान करिना तिच्या सीनवर लक्ष केंद्रीत करत होती. त्याचवेळी तिथे ठेवलेला कप तिच्या अंगावर फेकण्याचा बहाणा केला. अक्षयच्या या कृतीनं काही सेकंदासाठी करिना गडबडली पण नंतर अक्षयला हसताना पाहिल्यावर तिला समजलं की तो कप रिकामी होता.
मिताली राजची भूमिका साकारणार ही स्टार अभिनेत्री, Shabbas Mithu 1st Look रिलीज

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर यावर्षी त्याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय वर्षाच्या अखेरीस त्याचा ‘बच्चन पांडे’ सुद्धा रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्यानं त्याच्या चाहत्यांना पुढच्या वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. आमिर खानसाठी अक्षयनं त्याच्या ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. याशिवाय ‘बेल बॉटम’ हा त्याचा आणखी एक सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होत आहे.
मोदींनंतर Man v/s Wild मध्ये रजनीकांत, भयानक जंगलात ग्रिल सोबत असताना झाला अपघात मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.