तुमच्या घरातली भांडणं तर माझ्यामुळेच कमी होत असतील, मोदींचा अक्षयला चिमटा

पंतप्रधान झाल्यानंतर जो फायदा मला मिळाला आहे, तोच फायदा कदाचित आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधान झालेल्या व्यक्तीला मिळाला असेल.

पंतप्रधान झाल्यानंतर जो फायदा मला मिळाला आहे, तोच फायदा कदाचित आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधान झालेल्या व्यक्तीला मिळाला असेल.

  • Share this:
    नवी दिल्ली, २४ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार काही वेळासाठी अभिनेत्याच्या भूमिकेतून रिपोर्टरच्या भूमिकेत शिरला होता. आता रिपोर्टर व्हायचं म्हटल्यावर प्रश्न तर विचारावेच लागतील ना... मग काय प्रश्न विचारण्यासाठी त्याने चक्क पंतप्रधानांचीच मुलाखत घ्यायचं ठरवलं. यावेळी खिलाडी कुमारने असे काही प्रश्न विचारले की ते ऐकून पंतप्रधान मोदी जोरजोरात हसायला लागले. ही संपूर्ण मुलाखत सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यावेळी सोशल मीडियाशी निगडीतही अनेक प्रश्न अक्षयने मोदींना विचारले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारच्या पत्नीचा ट्विंकल खन्नाचाही उल्लेख यावेळी केला. मोदी म्हणाले की, ‘मी ट्विंकल यांनाही ट्विटरवर पाहतो. त्या माझ्यावर एवढ्या राग काढतात की कधी कधी मला वाटतं की, तुमच्या घरात फार चांगलं वातावरण असेल कारण ट्विंकल त्यांचा सगळा राग ट्विटरवरच काढतात.’ अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी यावेळी अक्षय मोदींना म्हणाला की, जसा मी माझ्या कुटुंबासोबत राहतो. माझी आई माझ्यासोबत राहते तसं तुम्हाला तुमच्या आईसोबत भावासोबत संपूर्ण कुटुंबासोबत राहावसं वाटत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना मोदी म्हणाले की, ‘मी फार लहान असताना कुटुंब सोडलं. माझी आई तर मला म्हणते की माझ्या मागे वेळ कशाला वाया घालवतोस.’ यानंतर अक्षयने त्यांना कमी झोपण्याचं गुपित सांगायची विनंती केली. अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे- पंतप्रधान झाल्यानंतर जो फायदा मला मिळाला आहे, तोच फायदा कदाचित आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधान झालेल्या व्यक्तीला मिळाला असेल. इतक्या वर्षांपर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी होतो, अतिशय बारकाईनं काम करावं लागतं. मुद्दे तुमच्यासमोर थेट येतात आणि त्यांचं समाधानदेखील तुम्हाला थेटच करावं लागतं - पंतप्रधान मोदी मला अलादीनचा दिवा मिळाल्यास मी त्याला सांगेन की जेवढेही समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षक आहेत, त्यांनी भावी पिढीला अलादिनच्या दिव्याची कहाणी सांगणं बंद करावं आणि विद्यार्थ्यांना परिश्रम घेण्याचे शिक्षण द्यावे - पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणूक 2019- उर्मिला मातोंडकरच्या मदतीला धावून आली शबाना आझमी, असा केला प्रचार जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे बँक खातं नव्हतं. आमदार होण्यापूर्वी माझं बॅंकेत खातं नव्हतं. जेव्हा आमदार झालो तेव्हा वेतन मिळू लागलं. शाळेत असताना देना बँकेचे कर्मचारी आले होते. त्यांनी मुलांना पैसे ठेवण्यासाठी गल्ले दिले होते आणि सांगितलं होतं की यामध्ये पैसे साठवून बँकेत जमा करा. पण तेव्हा पैसेच नव्हते. तेव्हापासून बँक खातं बंदच होतं. - पंतप्रधान मोदी ममता दीदी वर्षातून एक-दोन कुर्ते आजही मला पाठवतात. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वर्षातून तीन-चार वेळा ढाका येथील मिठाई आठवणीनं पाठवतात. ममता दीदीदेखील मला मिठाई पाठवतात -पंतप्रधान नरेंद्र मोदी कुरळे केस, टिकली आणि साडी : 'भारत'मध्ये अशी दिसते सलमानची 'मॅडम सर' VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी <iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-366135" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzY2MTM1/"></iframe>
    First published: