मुंबई, 7 नोव्हेंबर- अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. शोच्या प्रमोशनसाठी अक्षय-कतरिना अलीकडेच कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये खास पाहुणे म्हणून पोहोचले होते. यादरम्यान, शोचे कलाकार आणि बॉलीवूडची हिट जोडी धमाल करताना दिसली. प्रत्येक वेळी अक्षयसोबत चित्रपटात काम करण्याची मागणी करणार्या कपिल शर्माला यावेळी स्वत: अक्षयने चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली, मात्र त्यासाठी त्याने कपिलसमोर एक अटसुद्धा ठेवली आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार अनेकदा कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतो. बेलबॉटम चित्रपटाच्या प्रमोशननंतर अक्षय पुन्हा एकदा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटासाठी तेथे पोहोचला आहे. दोघे पुन्हा एकदा मस्ती करताना दिसत आहेत. जेव्हा जेव्हा दोघे भेटतात तेव्हा ते एकमेकांच्या पैशाबद्दल नक्कीच बोलतात. यावेळीही तेच होणार आहे. मात्र यावेळी अक्षय कपिलवर बाजी मारणार आहे.
कपिल शर्मा बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारजवळ त्याच्या चित्रपटात काम करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करत होता. यावेळी कपिल शर्माच्या सेटवर अक्षय कुमार कपिलला चित्रपटात काम करण्यास ऑफर देत आहे, पण त्यासाठी त्याने एक अट ठेवली आहे. ती ऐकल्यानंतर कपिल शर्माची बोलती बंद झाली आहे. सोनी टीव्हीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की आगामी भाग खूप मनोरंजक असणार आहे.हा भाग अजून टीव्हीवर प्रक्षेपित झालेला नाही.
(हे वाचा:Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून मायशा अय्यर OUT; ईशान सेहगलला अश्रू अनावर)
व्हिडिओमध्ये अक्षय म्हणतो, 'मी जेव्हा तुझ्या शोमध्ये येतो तेव्हा मी पैसे घेतो', ज्याला कपिलने नाही असे उत्तर दिले. यानंतर अक्षय कपिलचा पाय ओढत म्हणतो, मग 'जेव्हा तू माझा चित्रपट साइन करशील तेव्हा पैसे घेऊ नकोस. कारण मी आल्यावर एकही पैसा घेत नाही. अक्षयच्या बोलण्याला कपिलकडे उत्तर नसतं. तेव्हा अक्षय त्याची चेष्टा करतो आणि म्हणतो, 'अब नहीं बोलेगा'.कपिल आणि अक्षय कुमारमध्ये फार छान बॉन्डिंग आहे. ते एकमेकांची नेहमीच चेष्टा मस्करी करत असतात. तसेच सोशल मीडियावरसुद्धा ते एकमेकांची मस्करी करतांना दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.