सात वर्ष पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून राहिलेल्या भारताच्या या 'रॉबिनहुड'वर येणार सिनेमा

सात वर्ष पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून राहिलेल्या भारताच्या या 'रॉबिनहुड'वर येणार सिनेमा

विशेष म्हणजे ते तिथे मुस्लिम होऊन राहिले होते.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- बॉलिवूडचे नावाजलेले दिग्दर्शक नीरज पांडे आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा एकत्र काम करायला सज्ज झाला आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही हिट जोडी राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार (NSA) अजित डोभाल यांच्या आयुष्यावर एक सिनेमा तयार करण्यात येणार आहे. यात अजित डोभाल यांची व्यक्तिरेखा अक्षय कुमार साकारणार असून नीरज पांडे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या जोडीने याआधी बेबी आणि स्पेशल 26 सिनेमांत एकत्र काम केलं होतं.

'मुंबई मिरर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अजित डोभाल यांच्या करिअरवर तयार होणाऱ्या या सिनेमात त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांना दाखवण्यात येणार आहे. असं असलं तरी हा सिनेमा सुरू व्हायला बराच काळ लागणार आहे. याचं मुख्य कारण अक्षय कुमार सध्या 'मिशन मंगल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो 'सूर्यवंशी' सिनेमाचं चित्रीकरणही करत आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर अक्षय लगेच बच्चन पांडे सिनेमाचं चित्रीकरण सुरू करणार आहे. याशिवाय निरज पांडेही अजय देवगण स्टारर 'चाणक्य' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असणार आहे.

नीरज पांडे आमि अक्षयमध्ये भांडण झाल्याच्या आल्या होत्या बातम्या-

'बेबी' आणि 'स्पेशल 26' सिनेमांनंतर निर्मात्यांसाठी ही सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन देणारी जोडी वाटत होती. तेव्हा अनेक निर्मात्यांनी दोघांनी एकत्र घेऊन सिनेमे करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तेव्हा दोघांनीही एकत्र काम न करता वेगवेगळं काम करण्याला प्राधान्य दिलं होतं.

अजित डोभाल यांना मानलं जातं इंडियन रॉबिनहुड

एनसीए अजित डोभाल यांनी पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून काम केलं आहे. असं म्हटलं जातं की, जवळपास सात वर्ष ते पाकिस्तानात राहून भारतासाठी गुप्तहेराचं काम करत होते. विशेष म्हणजे ते तिथे मुस्लिम होऊन राहिले होते. याशिवाय भारतात परतल्यावर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ऑपरेशन केले.

असं मानलं जातं की, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्टाइकची जी रणनीती आखण्यात आली होती यात डोभाल यांची महत्त्वपूर्ण  भूमिका होती. अशात अजित डोभाल यांच्या आयुष्यावर तयार करण्यात येणारा सिनेमा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल यात काही शंका नाही. दरम्यान, नीरज पांडेने 'अ वेनसडे', 'बेबी', 'स्पेशन 26' या सिनेमांचं चित्रीकरण केलं आहे.

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'

Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या