Home /News /entertainment /

Breaking News: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला मातृशोक, आई अरुणा भाटिया यांचं निधन

Breaking News: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला मातृशोक, आई अरुणा भाटिया यांचं निधन

अक्षय कुमार आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला होता. अक्षय सध्या सिंड्रेला चित्रपटाचं युकेमध्ये शूटिंग करीत होते.

    मुंबई, 08 सप्टेंबर: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या  (Akshay kumar) आईचं निधन झालं आहे. अभिनेत्यानं ट्वीट करुन ही निधनाची बातमी शेअर केली आहे. अक्षयची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आज आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. अक्षय कुमारचं ट्विट, ती माझी गाभा होती आणि आज मला माझ्या अस्तित्वाच्या मुळाशी असह्य वेदना जाणवते. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे या जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगात परत आली. मी आणि माझे कुटुंब या वेदनेतून जात असल्याने मी तुमच्या प्रार्थनांचा आदर करतो. ओम शांती अक्षय कुमार लंडनमध्ये सिनेमाचं शूटींग करत होता. मात्र आईची तब्येत बिघडल्याची आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला. अक्षयचे अपकमिंग सिनेमे अक्षयनं नुकतंच आपला अपकमिंग सिनेमा बच्चन पांडे सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. त्याचा सूर्यवंश हा सिनेमा लवकरच रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच 30 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय अक्षय बेलबॉटम, अतरंगी रे, रक्षाबंधन, पृथ्वीराज आणि हाऊसफुल 5 सारख्या सिनेमे रिलीज होणार आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood

    पुढील बातम्या