मागितलं पाणी, मिळाली गुळ-भाकरी; झोपडीतल्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार

मागितलं पाणी, मिळाली गुळ-भाकरी; झोपडीतल्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार

'या अनुभवाने मी भारावून गेलोय. मला आणि मुलीला आयुष्यभराचा अनुभव दिला आणि खूप शिकायलाही मिळालं'

  • Share this:

मुंबई 31 ऑक्टोंबर : बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार कायम चर्चेत असतो. कधी चित्रपटांमुळे तर कधी सामाजिक कामांमुळे. शेतकऱ्यांपासून ते पूरग्रस्तांपर्यंत अशा प्रत्येकाला तो मदतीचा हात देत असतो. तसच त्याच्या समाजिक आशय असलेल्या चित्रपटांमुळेही तो सध्या चर्चेत असतो. त्याचा फिटनेस, त्याचे स्टंट यामुळे बॉलिवूडमध्येही त्याने एक वेगळीच ओळख निर्माण केलीय. अक्षय नुकताच चर्चेत आला तो त्याने ट्विट केलेल्या फोटोंमुळे सकाळी आपल्या मुलीसोबत मॉर्निंग वॉकला जाताना तो एका झोपडीत गेला. तिथे त्या वृद्ध दाम्पत्याने त्याला जो पाहुणचार दिला त्याने तो भारावला.

प्रीती झिंटाची 'दबंग 3' मध्ये एंट्री? सोशल मीडियावर PHOTO VIRAL

अक्षय आणि त्याची मुलगी निताराला घेऊन मॉर्निंग वॉकला गेला होता. त्यावेळी तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत गेला. त्यावेळी त्याने घरातल्या वृद्ध आजी आणि आजोबांना प्यायला पाणी मागितलं. त्यांनी पाणी तर दिलंच पण त्याचबरोबर त्यांना गुळ आणि भाकरही खायला दिली.

चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

Loading...

या अनुभवाने मी भारावून गेलोय. मला आणि मुलीला आयुष्यभराचा अनुभव दिला आणि खूप शिकायलाही मिळालं असंही अक्षयकुमारने म्हटलं आहे. अक्षय कुमार हा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी धावून जातो. कोल्हापूरमध्ये आलेला महापूर असो की बिहारमधला पूर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा प्रत्येक वेळी त्याने भरघोस आर्थिक मदत केलीय.

अक्षयकुमारचा हा 'हाऊसफुल्ल-4' हा चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. फक्त पाच दिवसांमध्ये 100 कोटींचा गल्ला त्याने जमवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...