...आणि मोदींना हसूच आवरेना

...आणि मोदींना हसूच आवरेना

अक्षय कुमार नुकताच मोदींना भेटला. त्यानं आपल्या या सिनेमाबद्दल सांगितलं.

  • Share this:

10 मे : ' टाॅयलेट एक प्रेमकथा' हे सिनेमाचं नाव ऐकलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हसूच आवरेना. अक्षय कुमार नुकताच मोदींना भेटला. त्यानं आपल्या या सिनेमाबद्दल सांगितलं.

अक्षय कुमार आता 'प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियान'वर आधारित असलेला 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट घेऊन येत आहे. याच संदर्भात अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अक्षयनं या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करत म्हणाला, 'नरेंद्र मोदी यांना मी माझ्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' चित्रपटाबद्दल सांगितलं तेव्हा या चित्रपटाचं नाव ऐकताच नरेंद्र मोदी यांचे हसूच आवरलं नाही.'

सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी अक्षय म्हणाला होता की, 54 टक्के भारतीयांना शौचालय म्हणजे काय हेच माहिती नाही आणि ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या माध्यमातून याविषयी तो भारतीयांशी बोलणार आहे. शौचालयाची माहिती नसणं किंवा त्याचा योग्य उपयोग न करणं ही आपली सगळ्यात मोठ्या समस्यांमधील एक आहे.'

या चित्रपटामध्ये अक्षयसोबत भूमी पेडणेकर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 03:11 PM IST

ताज्या बातम्या