बॉलिवूडचा खिलाडी कुमार आता Man vs Wild मध्ये, बीयर ग्रील्ससोबत करणार जंगल सफर

बॉलिवूडचा खिलाडी कुमार आता Man vs Wild मध्ये, बीयर ग्रील्ससोबत करणार जंगल सफर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांच्यानंतर आता अक्षय कुमार या शोमध्ये दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : जगभरात लोकप्रिय असलेला बीयर ग्रिल्सचा शो ‘मॅन वर्सेस वाइल्ड’चा फोकस सध्या भारतावर आहे. भारतातील शोचा पहिल्याच एपिसोड पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चित्रित केल्यानं हा शो खूप लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर आता सध्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत या शोचं शूटिंग कर्नाटकमध्ये करत आहे. त्यांच्यानंतर लवकरच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार या शोमध्ये दिसणार आहे.

रजनीकांत यांनी नुकतच बांदीपूरमधील शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतर आता अक्षय कुमार शूटिंगसाठी बीयर ग्रीलसोबत निघाला असल्याचं बोललं जात आहे. अक्षय कुमार सिनेमातील त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. याशिवाय बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अशाच बीयर ग्रील्ससोबत अक्षय कुमार मॅन वर्सेस वाइल्डमध्ये दिसणं त्याच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी असणार आहे.

प्रियांका चोप्रा फिटनेससाठी रोज 'हा' पदार्थ खाते, वाचून व्हाल हैरण

 

View this post on Instagram

 

Either you run the day or the day runs you 👊🏻 #MondayVibes #LetsDoThis

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

अक्षयला प्रेक्षकांनी आतापर्यंत फक्त रिअलिटी शो किंवा सिनेमात कठिण आणि खतरनाक स्टंट करताना पाहिलं आहे. त्यानंतर आता तो बीयर ग्रीलसोबत जंगल सफारीवर निघालेला पाहायला मिळाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांच्यानंतर या शोमध्ये दिसणारा अक्षय कुमार हा तिसरा भारतीय आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर टेलिकास्ट होणाऱ्या या शोचं शूटिंग रजनीकांत आणि ग्रिल्स यांनी कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिजर्व्हमध्ये केल. पण या शूटिंग दरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाली आहे.

फोटोग्राफर्सना पाहून अक्षय कुमारनं हे काय केलं? VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल

एका वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार मॅन वर्सेस वाइल्डच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना सुपरस्टार रजनीकांत यांना दुखापत झाली आहे. रजनीकांत आणि बेयर ग्रिल्स सध्या कर्नाटकच्या बांदीपूर अभयारण्यात शूटिंग करत आहेत. या दरम्यान रजनीकांत जखमी झाल्याबद्दल बोलताना एक पोलिस अधिकारी म्हणाले, शूटिंग दरम्यान रजनीकांत यांचं स्वतःवरच नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या हाताला आणि कोपरावरही जखमा झाल्या आहेत. पण रजनीकांत यांना झालेली दुखापत फार गंभीर नाही ते लवकरच ठीक होतील.

समलैंगिक विवाहाबद्दल विधान करून फसला आयुष्मान खुराना, Twitter वर मागितली माफी

First published: January 30, 2020, 11:18 AM IST

ताज्या बातम्या