अक्षय कुमार फक्त तीनच स्त्रियांचे फोन उचलतो

अक्षय कुमार फक्त तीनच स्त्रियांचे फोन उचलतो

अक्षय कुमारनं सांगितलं कामाच्या वेळी तो दुसरीकडे अजिबातच लक्ष देत नाही. त्याला कुणी डिस्ट्रब केलेलं आवडतही नाही.

  • Share this:

मुंबई, 30 आॅक्टोबर : सध्या करण जोहरच्या काॅफी विथ करण शोची खूप चर्चा आहे. या शोचा पहिला एपिसोड तर झाला. आता दुसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंगनं बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलाय.

अक्षय कुमारनं सांगितलं कामाच्या वेळी तो दुसरीकडे अजिबातच लक्ष देत नाही. त्याला कुणी डिस्ट्रब केलेलं आवडतही नाही. अक्षयनं सांगितलं, तो कितीही बिझी असला तरी तीन स्त्रियांचे फोन उचलतो. कोण आहेत या तीन स्त्रिया?

एक आहे अक्षयची आई, दुसरी आहे त्याची बायको ट्विंकल खन्ना आणि तिसरी व्यक्ती त्याची मॅनेजर जेनोबिया. अक्षय हातातलं सगळं काम सोडून या तिघींचे फोन उचलतोच.

अक्षयला विचारलं ट्विंकल सोडून या इंडस्ट्रीत सर्वात हाॅट अभिनेत्री कोण आहे? त्यावर त्यानं लगेच उत्तर दिलं दीपिका पदुकोण. त्यावेळी रणवीरचा चेहरा बघण्यासारखा होता. अर्थात, यावर रणवीरनंही हसून मान हलवली.

करिना कपूर आणि अक्षय कुमार  गुड न्यूज सिनेमात एकत्र असतील. करण जोहर दोघांना या सिनेमातून एकत्र आणणार आहे. राज मेहता सिनेमाचं दिग्दर्शन करेल.

करिना-अक्षय खूप दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. रावडी राठोड, अजनबी, ऐतराज असे अनेक सिनेमे दोघांनी एकत्र केलेत. त्यांची एकमेकांबरोबरची केमिस्ट्री चांगली खुलून दिसते.

अक्की त्याच्या फिटनेसबद्दल तो भलताच जागरुक आहे. अक्षय रोज 7च्या आत जेवतो. जेवणाबरोबर अक्षय व्यायामाबाबतीत पण तितकाच आग्रही आहे. त्यामुळे तो रोज सकाळी 4:30ला उठतो आणि स्वीमिंग करतो. तसंच मार्शल आर्टस आणि मेडिटेशनसाठी तो रोज एक-एक तास काढतो.

अक्षय त्याचा डाएट चार्ट न चुकता फॉलो करतो. तो नाष्ट्यामध्ये पराठा आणि एक ग्लास दूध पितो, नंतर तो बाऊल भरून फळं खातो. दुपारी जेवणात हिरव्या भाज्या, चपाती, डाळ, चिकन आणि एक वाटी दही असतं. संध्याकाळी एक ग्लास ज्युस आणि रात्रीचं तो फक्त सुप, सॅलेड खातो.

'काॅफी विथ करण'मध्ये रणवीरनं उलगडलं त्याच्या फंकी पोशाखामागचं गुपित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 11:04 AM IST

ताज्या बातम्या