मुंबई, 25 जानेवारी : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या सेल्फी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अभिनेता इमरान हाशमीबरोबर अक्षय कुमार सेल्फीमधून पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. मागच्या काळात आलेले अक्षयचे बरेच सिनेमे फ्लॉप ठरलेत. आता येणाऱ्या सेल्फी सिनेमाकडून प्रेक्षकांनी जास्त अपेक्षा ठेवल्याचं दिसत नाही. दरम्यान अक्षय कुमार शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला गेला होता. साई बाबांची पाद्यपुजा करत अक्षयनं तिथे मनोभावे दर्शन घेतलं. मात्र दर्शन घेऊन निघताना अक्षयनं जे काही केलं ते कॅमेरात कैद करण्यात आलंय. तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अभिनेता अक्षय कुमारने आज शिर्डीत साई दरबारी दर्शनाला हजेरी लावली. निस्सीम साईभक्त असलेला अक्षय अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो. आज अक्षय कुमारने साईबाबांची पाद्यपुजा करत मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या मंदिरात पोहोचताच अक्षयला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अक्षयसाठी मंदिरात मोठी पोलीस सुरक्षा देखील तैनात करण्यात आली होती. अक्षयनं देखील चाहत्यांशी संवाद साधला.
हेही वाचा - Pathaan: रितेश देशमुखलाही 'पठाण'चं वेड; शाहरुखच्या सिनेमासाठी केलेलं ते ट्विट चर्चेत
अक्षय कुमार शिर्डी मंदिरात सातत्यानं येत जात असतो. त्याला पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. यावेळीही अक्षयला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीतून रस्ता काढत अक्षय बाहेर येत असताना त्याला अनेक जण भेटण्यासाठी येत होते. या गर्दीत अक्षयला भेटण्यासाठी आलेला एका भाविक पडला. त्याला पडताना पाहून अक्षय देखील थांबला आणि त्यानं गर्दीमध्ये पडलेल्या त्याला भाविकाला उचलंल. तुम्हाला लागलं नाही ना? काळजी घ्या, अशी विनंती देखील शाहरुखनं त्याला केली. शाहरुखा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याच्या या वागण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचं तर राज मेहता दिग्दर्शित सेल्फी सिनेमात तो दिसणार आहे. 24 फेब्रुवारीला सेल्फी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. त्यावेळी अक्षय कुमारनं पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्त्व असल्याचं म्हटलं. यंदा अक्षय कुमार मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News