Bachchan Pandey चं पोस्टर लाँच, हटके लूकमुळे अक्षय कुमार पुन्हा चर्चेत

पुढील वर्षी अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 02:25 PM IST

Bachchan Pandey चं पोस्टर लाँच, हटके लूकमुळे अक्षय कुमार पुन्हा चर्चेत

मुंबई, 26 जुलै : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी एका मागोमाग एक बरेच सिनेमे रिलीज होत आहेत. सध्या अक्षय त्याचा आगामी सिनेमा मिशन मंगलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली. त्यानंतर आता त्याच्या आणखी एका आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. ज्यात अक्षयला ओळखणंही कठीण झालं आहे. या पोस्टरवरील अक्षयचा लुक खूपच वेगळा आहे. हा त्याचा लुक आतापर्यंतचा सर्वात वेगळा लुक मानला जात आहे. या सोबतच या सिनेमाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे.

अक्षय कुमार यावर्षी एका मागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमे देत आहे पण याशिवाय पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर अक्षयचा आणखी एक सिनेमा ‘बच्चन पांडे’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला. यामध्ये अक्षय कुमार कपाळाला भस्म, गळ्यात जाडजूड चेन आणि लुंगी अशा वेगळ्याच अवतारात दिसत आहे. तसेच त्याच्या हातात नान चाकू सुद्धा दिसत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर करताना अक्षयनं लिहिलं, ‘साजिद नाडियावालाचा आगामी सिनेमा, फरहाद सामजी यांचं दिग्दर्शन 2020 ख्रिसमसला येतोय मी बच्चन पांडे बनून.’

शाहरुखच्या मुलासोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

या सिनेमातील अक्षयच्या या डॅशिंग लुकला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या तरी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार असं बोललं जात आहे. असं झाल्यास आमिर खानच्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाशी अक्षयच्या सिनेमाची टक्कर होईल. याशिवाय याच दिवशी अजय देवगण आणि रणबीर कपूर यांचे आगामी सिनेमाही याच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे. असं झालं तर मात्र बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळू शकते.

अमृता खानविलकरने शेअर केले हॉट फोटो, या कारणासाठी आहे चर्चेत

याआधी यंदा अक्षयचा मिशन मंगल हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. ज्यात अक्षयसोबत विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशा अभिनेत्री दिसणार आहेत. याशिवाय त्याचे 'सूर्यवंशी', 'हाऊसफुल 4', 'बॉम्बे लक्ष्मी' आणि 'गुड न्‍यूज' हे सिनेमा याच वर्षी रिलीज होणार आहेत.

शाहरुखच्या मुलासोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

================================================================

VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...