अक्षय कुमारला मोदींच्या भूमिकेची आॅफर

अक्षय कुमारला मोदींच्या भूमिकेची आॅफर

नरेंद्र मोदींची भूमिका अक्षय कुमारच चांगल्या पद्धतीने करू शकेल असं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं म्हणणं आहे. त्यांची ही इच्छा सत्यात उतरते की नाही हे अक्षयच्या होकारानंतर स्पष्ट होईल.

  • Share this:

22 जून : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. यातच आणखी एक भर पडलीय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची.एवढंच नव्हे तर खिलाडी कुमार नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या बायोपिकसाठी परेश रावल, अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी यांची नावंसुद्धा चर्चेत होती.नरेंद्र मोदींची भूमिका अक्षय कुमारच चांगल्या पद्धतीने करू शकेल असं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं म्हणणं आहे. त्यांची ही इच्छा सत्यात उतरते की नाही हे अक्षयच्या होकारानंतर स्पष्ट होईल.

सध्या अक्षय 'टाॅयलेट एक प्रेमकथा' सिनेमात बिझी आहे. त्यासाठी तो पंतप्रधान मोदींनाही भेटला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...