मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेता अक्षय कुमारला झाली कोरोनाची लागण

अभिनेता अक्षय कुमारला झाली कोरोनाची लागण

अक्षय कुमार (Akshay Kumar) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 एप्रिल: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान बॉलिवूडचा अक्शन हिरो अक्षय कुमार (Akshay Kumar) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांना सध्या घरातच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. (Akshay Kumar has tested positive) माझी तब्येत स्थिर कोणीही काळजी करु नये अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे. शिवाय कोरोनापासून सावध राहा, घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या. असा सल्ला त्यानं चाहत्यांना दिला आहे.

अवश्य पाहा - परवीन बाबीची Love Tragedy; डॅनी ते महेश भट्ट, अनेकांशी केलं अफेअर पण अखेर राहिली एकटी!

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक

महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.

First published:

Tags: Akshay Kumar, Coronavirus symptoms, Vaccinated for covid 19