वाढदिवसनिमित्त अक्षय कुमारन दिलं चाहत्यांना स्पेशल गिफ्ट

वाढदिवसनिमित्त अक्षय कुमारन दिलं चाहत्यांना स्पेशल गिफ्ट

त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यानं त्याच्या चाहत्यांना एक स्पेशल गिफ्ट दिलंय.

  • Share this:

09 सप्टेंबर: खिलाडी अक्षय कुमारचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यानं त्याच्या चाहत्यांना एक स्पेशल गिफ्ट दिलंय.

हे गिफ्ट दुसरं तिसरं काही नसून त्याच्या नवीन सिनेमा गोल्डचं पोस्टर आहे. हे पोस्टर शेअर करताना माझ्या काळजाजवळच्या  सिनेमाचं पोस्टर शेअर करत असल्याचं अक्षय कुमार म्हणतोय.

या पोस्टरमध्ये सुवर्ण पदकावर अक्षयचा चेहरा दिसून येतोय. तसंच लोकांनी भरलेलं स्टेडियमही यामध्ये पाहायला मिळतंय. 'द ड्रिम दॅट युनायटेड अ नेशन' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. रिमा कागती दिग्दर्शित हा सिनेमा लंडनमध्ये पार पडलेल्या 14व्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिल्या मिळालेल्या सुवर्ण पदकावर आधारित आहे. तसंच पुढील वर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.

First published: September 9, 2017, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading