अक्षय कुमारने बायकोला दिले सगळ्यात महागडे झुमके, PHOTO पाहून पोट धरून हसाल

अक्षय कुमारने बायकोला दिले सगळ्यात महागडे झुमके, PHOTO पाहून पोट धरून हसाल

अक्षयनं त्याच्या बायकोला सर्वात महागडं गिफ्ट दिल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सध्या त्याचा आगमी सिनेमा 'गुड न्यूज'च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यानं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. हा एपिसोड लवकरच प्रसारित होईल पण या शोचं शूटिंग पूर्ण करुन अक्षय कुमार जेव्हा घरी परतला त्यावेळी त्यानं त्याच्या पत्नीसाठी एक खास गिफ्ट आणलं. विशेष म्हणजे ट्विंकल खन्नालाही ते गिफ्ट फार आवडलं. तिनं या गिफ्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

अक्षय कुमारनं ट्विंकलला दिले कांद्याचे झुमके

अक्षयनं ट्विंकल खन्नाला दिलेलं गिफ्ट होतं कांद्याचे झुमके. तिनं इन्स्टाग्रामवर या झुमक्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, माझा नवरा ‘द कपिल शर्मा शो’चं शूटिंग पूर्ण करुन घरी आला आणि मला म्हणाला, ते लोक करिनाला हे कानातले दाखवत होते. मला नाही वाटलं की ती यामुळे जास्त इंप्रेस झाली. पण मला वाटलं तुला हे नक्कीच आवडतील. म्हणून मी तुझ्यासाठी हे घेऊन आलो. कधी कधी अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद देऊन जातात. #onionearrings #bestpresentaward

करिनाच्या शोमध्येच सासू शर्मिला टागोरनी समजावला मुलगी आणि सूनेमधील फरक

ट्विंकलनं शेअर केलेल्या कांद्याच्या झुमक्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे वाढलेले भाव लोकांची डोकेदुखी ठरत आहेत. संसदे पासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच कांद्याची चर्चा आहे. त्यामुळे अक्षयनं त्याच्या बायकोला सर्वात महागडं गिफ्ट दिल्याचं म्हटलं जात आहे.

मलायकाशी घटस्फोट, गर्लफ्रेंड जॉर्जियाशी दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर भडकला अरबाज!

अक्षयच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा गुड न्यूज हा सिनेमा 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त करिना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. करण जोहरची निर्मिती असलेला हा सिनेमा सरोगसी विषयावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठमोळ्या स्मिता पाटील यांनी बदलला बॉलिवूड सिनेमांचा चेहरा!

Published by: Megha Jethe
First published: December 13, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading