VIDEO : अक्षय कुमारनं लेकीसोबत 'अशी' साजरी केली संक्रांत

VIDEO : अक्षय कुमारनं लेकीसोबत 'अशी' साजरी केली संक्रांत

संक्रांतीचा सण सगळीकडेच जोरदारपणे साजरा होतोय. बाॅलिवूडचे स्टार्सही हा सण एंजाॅय करतायत. बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनंही पतंगबाजी केली.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : संक्रांतीचा सण सगळीकडेच जोरदारपणे साजरा होतोय. बाॅलिवूडचे स्टार्सही हा सण एंजाॅय करतायत. बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनंही पतंगबाजी केली.

अक्षय आणि त्याची मुलगी नितारा यांनी पतंग उडवला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अक्षय आपल्या कुटुंबासोबत बिझी शेड्युलमधून वेळ घालवतोच. अक्षयनं निताराला छोटी सहाय्यकही म्हटलंय. सगळ्यांना शुभेच्छाही दिल्यात.

अक्षय कुमारच्या 2.0चं खूप कौतुक झालं. तो केसरी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. तो आणि परिणितीचं शूटिंग जयपूरमध्ये सुरू होतं. ते आता संपलंय.

अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांचं शूटिंगनंतरचं फर्स्ट लूक समोर आलंय. त्यात अक्षय शीख बनलाय. तो अँग्री यंग मॅन दिसतोय. त्याच्या सोबत परिणिती एकदम पंजाबी लूकमध्ये दिसतेय. तिनं पंजाबी ड्रेस घातलाय.

काही दिवसांपूर्वी अक्षयनं केसरी सिनेमाचा एक लूक रिलीज केला होता. या सिनेमात परिणितीची तशी छोटी भूमिका आहे.पण सिनेमा ऐतिहासिक असल्यामुळे तिनं तो स्वीकारला. मागे बाँबे टाइम्सशी बोलताना ती म्हणाली, मला एखाद्या ऐतिहासिक सिनेमात मोठी भूमिका करायचीय. पण आता मी सुरुवात केसरीपासून करणार आहे.

1897मध्ये झालेल्या सारागढच्या युद्धावर केसरी हा सिनेमा आहे. त्यावेळी 21 बहादूर शीख सैनिकांनी अफगाणच्या 10 हजार सैनिकांशी मुकाबला केला होता. राजकुमार संतोषींचं दिग्दर्शन असलेला बॅटल आॅफ सारागढी हा सिनेमाही तयार होतोय. तर केसरीचं दिग्दर्शन अनुराग सिंग करतोय. करण जोहरची निर्मिती आहे.

First published: January 14, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading