गरोदर बायकांमध्ये फसला अक्षय कुमार, बहुचर्चित Good Newwz चं पोस्टर रिलीज

गरोदर बायकांमध्ये फसला अक्षय कुमार, बहुचर्चित Good Newwz चं पोस्टर रिलीज

केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 नंतर आता त्याच्या ‘गुड न्यूज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटला येत आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : अक्षय कुमारच्या सिनेमांचा धडाका यंदाच्या वर्षी सुरूच आहे. केसरी, मिशन मंगल, हाउसफुल 4 नंतर आता त्याच्या ‘गुड न्यूज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटला येत आहे. या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. अक्षयनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हे पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर अक्षय कुमार दोन गरोदर बायकांच्यामध्ये फसलेला दिसत आहे. ज्यावर युजर्सच्या खूपच विनोदी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अक्षय कुमारनं या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर एका बाजूला करिना कपूर तर दुसऱ्या बाजूला कियारा अडवणी दिसत आहेत. या दोघीही प्रेग्नन्ट असलेल्या दाखवण्यात आलं असून अक्षय कुमार या दोघींच्या बेबी बंपमध्ये फसलेला दाखवण्यात आला आहे. हे पोस्टर शेअर करताना अक्षयनं लिहिलं, Squeezing' in some #GoodNewwz for you this #Christmas season. Stay tuned, the biggest goof-up of the year is coming!

दीपिका-रणवीरनं साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पाहा PHOTO

याशिवाय त्यानं आणखी एक पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. ज्यात एकीकडे करिना कपूर तर दुसरीकडे कियारा अडवाणी दिसत असून या दोघींच्या मध्ये दिलजीत दोसांझ आणि अक्षय कुमार दिसत आहे.

9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय करिना

अक्षय कुमार आणि करिना कपूर या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम करणार आहेत. याआधी 2009 मध्ये या दोघांनी कमबख्त इश्क या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता ते दोघं पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात कियारा अडवाणी आणि दिलजित दोसांज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे.

थरकाप उडवणारा Mardaani 2 Trailer पाहिल्यावर चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका!

सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाची कथा सरोगेसीवर आधारित आहे. याआधी 2002 मध्ये मेघना गुलजार यांनी फिलहाल हा सिनेमा तयार केला होता. याशिवाय याच विषयावर अभिनेत्री कृती सेननचा मीमी हा सिनेमा सुद्धा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रियांका-निकनं खरेदी केलं 7 बेडरुमचं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क!

======================================================

इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE

First published: November 14, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading