मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नाही मिळाला ऐश्वर्या रायबरोबर Selfie मग अक्षय-इमराननं केला असा जुगाड; फोटो व्हायरल

नाही मिळाला ऐश्वर्या रायबरोबर Selfie मग अक्षय-इमराननं केला असा जुगाड; फोटो व्हायरल

akshay kumar

akshay kumar

आवडत्या व्यक्तीनं सेल्फी नाही दिला तर? असंच काहीसं झालंय अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाशमी यांच्याबरोबर.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 जानेवारी :  सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडिया म्हटलं की, फोटो व्हिडीओ, व्ह्यूज, लाईक्स आले. सोशल मीडियावर फेसम असलेली एक गोष्ट म्हणजे सेल्फी. मागच्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये सेल्फीचं प्रचंड वेड पाहायला मिळत आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर सेल्फी काढायला मिळणं म्हणजे सोने पे सुहागा. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीबरोबर सेल्फी काढणं हे तर प्रत्येक चाहत्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण त्या सेलिब्रेटीनं किंवा आवडत्या व्यक्तीनं सेल्फी नाही दिला तर? असंच काहीसं झालंय अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाशमी यांच्याबरोबर. त्यांना हवा होता अभिनेत्री ऐश्वर्या रायबरोबर सेल्फी. पण ऐश्वर्यानं सेल्फी न दिल्यानं दोघांची काय आणि कसा जुगाड केला हे तुम्हीच पाहा.

इमरान हाशमीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. ज्यात त्यानं एक अक्षय कुमारबरोबरचा सेल्फी पोस्ट केलाय. या सेल्फीमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील आहे. पण ऐश्वर्या स्वत: सेल्फीमध्ये नाहीये तर ऐश्वर्याचा फोटो आहे. हा फोटो बंटी और बबली या सिनेमातील कजरारे गाण्यातील आहे. अक्षय आणि इमरान यांनी ऐश्वर्याच्या फोटोबरोबर सेल्फी काढला आहे. इमराननं फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे. त्यानं म्हटलंय, 'चला तिच्याबरोबर नाही तर तिच्या फोटोबरोबर तरी सेल्फी ठिक आहे... काय अक्षय कुमार'.

हेही वाचा - Radhika Madan: छोट्या पडद्याविषयी केलेलं 'ते' विधान राधिका मदनला पडलं महागात; आता एकता कपूरनेही फटकारलं

आता तुम्ही म्हणाला की अक्षय आणि इमरान हाशमीला ऐश्वर्यानं एक सेल्फी कसा काय दिला नाही. एकाच क्षेत्रात काम करूनही ऐश्वर्याबरोबर यांची कधीच भेट झाली नाही का? तर ऐश्वर्याच्या फोटोबरोबर सेल्फी काढण्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. हा सगळा प्रकार इमरान आणि अक्षय यांच्या आगामी सेल्फी सिनेमासाठी सुरू आहे. दोघांनी नव्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात केली आहे. प्रमोशनच्या सुरूवातीलाच दोघांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सेल्फी या सिनेमातून इमरान हाशमी मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर अक्षय कुमारचा 2023मधला हा पहिलाच सिनेमा आहे. सेल्फीसाठी दोघेही उत्सुक आहेत. 22 जानेवारीला सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. इमरान हाशमी आणि अक्षय कुमार सेल्फी सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  राज मेहता यांनी सेल्फी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सेल्फी  हा सिनेमा फुल्ल टू कॉमेडी सिनेमा असणार आहे.  अक्षय कुमारच्या आतापर्यंतच्या कॉमेडी सिनेमांपैकी सेल्फी हा त्याचा सर्वात कॉमेडी सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. अक्षय आणि इमरान यांची जोडी मोठ्या पडद्यावर काय जादू करणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. या दोघांव्यतिरिक्त डायना पेंटी, नुसरत भरूचा हे कलाकारही सिनेमात आहेत. 24 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय आणि इमरान हाशमीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News