मुंबई, 01 फेब्रुवारी : 1994साली आलेल्या 'मैं खिलाडी तू अनाडी' या सिनेमातील गाण्यात अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची जोडी चांगलीच हिट झाली होती. दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं 'मैं खिलाडी तू अनाडी' हे गाणं चांगलंच गाजलं. आजही गाण्यावर अनेकांचे पाय थिरकताना दिसतात. हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटील आलं आहे. अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी' या जुन्या गाण्याला नव ट्विस्ट देऊन गाणं रिलीज केलं आहे. मात्र नव्या गाण्यात सैफची जागा अभिनेता इमरान हाशमीनं घेतली आहे. जुन्या बीट्सवर नवीन तडका लावत अक्षय कुमार आणि सैफ अली खान गाण्यावर दणकून नाचले आहेत.
कॉमेडी ड्रामा असलेल्या 'सेल्फी' या सिनेमाचं कलाकार सध्या चांगलंच प्रमोशन करताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री नुसरत भरूचा आणि डायना पेंटी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलंय. 'लाइट्स, कॅमेरा, नाचो', म्हणत अक्षयनं गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
हेही वाचा - Rakhi Sawant: आईच्या निधनानंतर आता राखीचा संसार धोक्यात; हंबरडा फोडत म्हणाली 'माझं लग्न...'
सेल्फी सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज होताच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. गायक उदित नारायण आणि अभिजीत भट्टाचार्य यांनी जुनं गाणं गायलं आहे. तर अनु मलिक यांनी गाण्याला म्युझिक दिलं आहे. 'सेल्फी' सिनेमात या गाण्याचं रिक्रेशन तनिष्क बागची यांनी केलं आहे. गाण्यात अभिनेता अक्षय कुमार ग्रीन शिमर कोटमध्ये दिसतोय. त्याला पाहून प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. तर अभिनेता इमरान हाशमी अक्षयच्या स्पेट्स फॉलो करताना दिसतोय. तर गाण्यात अभिनेत्री नुसरत आणि डायना यांचा ग्लॅमरस लुक देखील पाहायला मिळतोय.
अक्षय आणि इमरान 'सेल्फी' सिनेमाच्या निमित्तानं पहिल्या एकत्र काम करत आहेत. सिनेमा 24 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. इमरान हाशमी देखील मोठ्या गॅपनंतर मोठ्या पडद्यावर येणार आहे. सिनेमातील रोमान्स बॉय खिलाडी कुमारबरोबर काय रंगत आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News