मुंबई, 29 मार्च : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी रुपये दान केल्यानं सर्वच स्तरातून अक्षय कुमारचं कौतुक होताना दिसत आहे. पण या कोरोना व्हायरस दरम्यान अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंटकल खन्नासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अक्षयची पत्नी ट्विंकलनं स्वतःच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात स्वतःच ड्रायव्हिंग करुन अक्षय तिला हॉस्पिटलमधून घेऊन येताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना दरम्यान ट्विंकल आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानं ट्विंकलला कोरोना व्हायरसची लागण झाली का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण याचं उत्तर स्वतः ट्विंकलनं या व्हिडीओमध्ये दिलं आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी अभिनेत्री झाली नर्स, अभिनय सोडून करतेय रुग्णांची सेवा
ट्विंकल म्हणाली, ‘मी आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पण मला कोरोना झालेला नाही. माझ्या पायाचं हाड मोडल्यानं आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. सध्या मुंबईचे सर्व रस्ते जवळपास रिकामी आहे. ड्रायव्हरला सुट्टी असल्यानं आज अक्षयच माझा ड्रायव्हर आहे.’ या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या पायाला प्लास्टर केलेलं पाहायला मिळात आहे.
Lockdown मध्ये एकमेकांना वेळ देत आहेत रणबीर-आलिया, VIDEO व्हायरल
The man makes me proud. When I asked him if he was sure as it was such a massive amount and we needed to liquidate funds, he just said, ‘ I had nothing when I started and now that I am in this position, how can I hold back from doing whatever I can for those who have nothing.’ https://t.co/R9hEin8KF1
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) March 28, 2020
ट्विंकल खन्ना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतच तिनं अक्षय कुमारबाबत एक ट्विट केलं होतं जे सोशल मीडियावर खूप व्हायरलही झालं. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, ‘मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी त्याला विचारलं की तू खरंच एवढी मोठी रक्कम दान करणार आहेस का? त्यावर त्यानं उत्तर दिलं, जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं. मी स्वतः काहीही नव्हतो. पण आज मी या जागी आहे. जिथे माझ्याकडे सर्वकाही आहे. मग अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देत असताना मागे-पुढे का पाहावं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करत आहे ज्यांकडे आज काहीच नाही.’
‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Twinkle khanna