काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांच्या मदतीला धावला अक्षय कुमार, दान केले कोट्यवधी रुपये

काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांच्या मदतीला धावला अक्षय कुमार, दान केले कोट्यवधी रुपये

याआधीही मे महिन्यात आलेल्या फेनी वादाळाचा फटका ओडिसाला बसला होता. यावेळीही अक्षयने पीडितांची 1 कोटी रुपये देऊन मदत केली होती.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै- आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत बॉलिवूडच खिलाडी कुमार पीडितांच्या मदतीला धावला आहे. नेहमीच आपल्या दानधर्मासाठी ओळखला जातो. आता अक्षयने आसामच्या मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत केली आहे. स्वतः अक्षयने ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली.

अक्षयने लिहिले की, ‘आसाममध्ये पुरात अडकलेल्या लोकांची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. माणसं असो किंवा प्राणी संकाटाच्या या काळात सगळ्यांना मदतीची गरज आहे. मी मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि काझीरंगा पार्क रेस्क्यूसाठी 1-1 कोटी रुपये मदत म्हणून देत आहे. तसेच लोकांनीही पुरपरिस्थितीत अडकलेल्या लोकांची आणि प्राण्यांची मदत करावी अशी मी विनंती करतो.’

याआधीही मे महिन्यात आलेल्या फेनी वादाळाचा फटका ओडिसाला बसला होता. यावेळीही अक्षयने पीडितांची 1 कोटी रुपये देऊन मदत केली होती. अक्षयशिवाय प्रियांका चोप्रानेही या आपत्तीतून पीडितांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

पुरामुळे आतापर्यंत बिहार आणि आसाममध्ये आतापर्यंत 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पावसाशीनिगडीत अपघातांमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काझीरंगा नॅशनल पार्कचा अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे. इथे दुर्मिळ एक शिंगी गेंडे आहेत. इथले अनेक प्राणी मृत्यूशी संघर्ष करत आहेत.

अक्षयच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, मल्टीस्टारर मिशल मंगल हा त्याचा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाशिवाय तो हाउसफुल 4, गुड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब आणि सूर्यवंशी या सिनेमांमध्येही झळकणार आहे. मिशन मंगलशिवाय हाउसफुल 4 आणि गुड न्यूज हे सिनेमे याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

लग्नाआधीच अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं ‘हे’ पाऊल

'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

‘खतरों के खिलाडी 10’ मध्ये दिसणार मराठीची ही सुपरस्टार अभिनेत्री

पुन्हा लव्ह सीन लीक झाल्यामुळे राधिका आपटे भडकली, म्हणाली....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या