मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बॉलिवूडच्या खिलाडीनं दाखवलं मोठं मन; काश्मीरमधील त्या शाळेसाठी अक्षयनं दिली आर्थिक मदत

बॉलिवूडच्या खिलाडीनं दाखवलं मोठं मन; काश्मीरमधील त्या शाळेसाठी अक्षयनं दिली आर्थिक मदत

27 जुलैला या शाळेच्या इमारतीच्या (School Building) नव्या बांधकामाची कोनशिला ठेवण्यात आली. या शाळेला अक्षयचे वडील हरिओम भाटिया यांचं नाव देण्यात आलं आहे

27 जुलैला या शाळेच्या इमारतीच्या (School Building) नव्या बांधकामाची कोनशिला ठेवण्यात आली. या शाळेला अक्षयचे वडील हरिओम भाटिया यांचं नाव देण्यात आलं आहे

27 जुलैला या शाळेच्या इमारतीच्या (School Building) नव्या बांधकामाची कोनशिला ठेवण्यात आली. या शाळेला अक्षयचे वडील हरिओम भाटिया यांचं नाव देण्यात आलं आहे

  नवी दिल्ली 29 जुलै: देशासाठी काहीतरी करावं अशी प्रत्येकालाच इच्छा असते मग बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actors) का मागं राहतील. बॉलिवूडमधले अभिनेते अनेक ठिकाणी मदत देत असतात. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) नुकतीच एक मोठी देणगी दिली. अक्षय कुमारने 17 जून हा दिवस सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) व्यतीत केला होता. त्यावेळ त्याने नीरू या गावाला भेट दिली होती. तिथं असलेल्या माध्यमिक शाळेच्या इमारतीची अवस्था खूपच वाईट होती. ती इमारत मोडकळीस आली होती. ती पाहून अक्षयने या इमारतीच्या जीर्णोद्धारासाठी मदत देण्याची इच्छा बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडे (Border Security Force) व्यक्त केली होती. त्यानुसार त्याने काश्मीरमधल्या नीरू गावातल्या माध्यमिक शाळेला जीर्णोद्धारासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

  अक्षयचे वडील कैलासवासी हरिओम भाटिया यांच्या नावे त्याने ही मदत केल्याचं स्पॉटबॉय या वेबसाइटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. 27 जुलैला या शाळेच्या इमारतीच्या (School Building) नव्या बांधकामाची कोनशिला ठेवण्यात आली. या शाळेला अक्षयचे वडील हरिओम भाटिया यांचं नाव देण्यात आलं आहे. बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना, वेस्टर्न कमांडचे महासंचालक सुरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. हा कार्यक्रम बीडब्लूडब्लूएच्या प्रमुख अनु अस्थाना यांच्या माध्यमातून झाला. बीएसएफने ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.

  तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सूत; असं झालं तिसरं लग्न

  ‘जम्मू-काश्मीरमधील नीरू गावातील हरिओम भाटिया सरकारी माध्यमिक शाळेची कोनिशिला बीएसएफचे महासंचालक (DG BSF) राकेश अस्थाना आणि पद्मश्री अभिनेता अक्षय कुमार यांनी वेब लिंकच्या माध्यमातून ठेवली. हा कार्यक्रम बीडब्लूडब्लूएच्या प्रमुख अनु अस्थाना यांच्या माध्यमातून झाला यावेळी बीएसएफच्या वेस्टर्न कमांडचे महासंचालक सुरेंद्र पवार उपस्थित होते,’ असं या बीएसएफच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  ...आणि ऐश्वर्याची लेक आराध्याने बाबा म्हणून अभिषेकऐवजी रणबीर कपूरलाच मारली मिठी

  अक्षय कुमारचे बेलबॉटम (Bell Bottom) आणि सूर्यवंशी (Sooryavanshi) हे दोन चित्रपट तयार असून प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. कोरोना काळात थिएटर बंद असल्याने ते प्रदर्शित झालेले नाहीत. ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही (OTT Platform) प्रदर्शित झालेले नाहीत. जर महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली तर थिएटर उघडतील 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी हे दोन्ही चित्रपट रिलिज होऊ शकतील. अक्षय कुमारच्या या दोन्ही चित्रपटांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटगृह उघडण्याची शक्यताही दाट आहे त्यामुळे बहुधा प्रेक्षकांना चित्रपटगृहांतच या चित्रपटांचा आनंद लुटता येईल.

  First published:
  top videos

   Tags: Akshay Kumar, BSF, Jammu kashmir