मुंबई,15 फेब्रुवारी- बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अक्षय अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसून येतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता आपल्या 'रामसेतू' चित्रपटामुळे वादात अडकला होता. दरम्यान आता अक्षय कुमार पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. आता अभिनेत्याने भारताच्या नकाशावर पाय ठेवल्याने सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. इतकंच नव्हे तर अभिनेत्याचं हे प्रकरण आता थेट गृहमंत्रालयात पोहोचलं आहे.
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात सक्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटासोबत भेटीला येत असतो. त्यातील काही चित्रपट हिट ठरतात. तर काहींना फ्लॉपचा दणका बसतो. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमार विवीध कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेता काही दिवसांपूर्वी आपल्या रामसेतू, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज या चित्रपटांमुळे चर्चेत होता. परंतु या चित्रपटांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. उलट या चित्रपटांच्या रिलीजदरम्यान अक्षय वादात सापडला होता.
अशातच आता अक्षय कुमारने पुन्हा एकदा असं काही केलं आहे, ज्यामुळे प्रेक्षक अभिनेत्यावर जाम भडकले आहेत.अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारा अभिनेता आहे.. तो आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत अनेक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. अनेकवेळा तो आपल्या आगामे सिनेमाचं प्रमोशन सोशल मीडियावर करताना दिसून येतो. प्रमोशनसाठी तो विविध फंडे वापरत असतो. त्याचे चाहतेही त्याला भरभरुन प्रतिसाद देत असतात.
The Entertainers are all set to bring 100% shuddh desi entertainment to North America. Fasten your seat belts, we’re coming in March! 💥 @qatarairways pic.twitter.com/aoJaCECJce
— Akshay Kumar (@akshaykumar) February 5, 2023
परंतु यावेळी अक्षयच्या या कृतीचा निषेध केला जात आहे.नुकतंच अक्षय कुमार आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून आला. याला अनुसरुन त्याने एका एयरलाईन कंपनीची जाहिरात केलीय. या व्हिडीओमध्ये तो चक्क भारताच्या नकाशावर चालताना दिसून आला. अभिनेत्याला हे वागणं महागात पडल्याचं दिसून येत आहे. त्याचा हा प्रमोशन फंडा प्रेक्षकांना रुचलेला नाहीय. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय कुमारवर रोष व्यक्त करताना दिसून येत आहेत.
दरम्यान अक्षय कुमार आपल्या या व्हिडीओमुळे अडचणीत सापडताना दिसून येत आहे. एका वकिलाने अक्षय कुमार विरोधात थेट गृहमंत्रालयात धाव घेतली आहे. त्याने अक्षयविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता अक्षय कुमार या प्रकरणावर काय उत्तर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment