मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Akshay Kumar: अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला; सिनेमाच्या सेटजवळ घडली घटना

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला; सिनेमाच्या सेटजवळ घडली घटना

अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay Kumar Makeup Artist Attacked By Leopard : बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या आपल्या 'बडे मियाँ आणि छोटे मियाँ' या आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 18 फेब्रुवारी- बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या आपल्या 'बडे मियाँ आणि छोटे मियाँ' या आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत. या चित्रपटाबाबत आणि दोन्ही कलाकारांबाबत विविध गोष्टी दररोज समोर येत असतात. दरम्यान आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.अक्षय कुमारच्या या बहुचर्चित चित्रपटात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या श्रवण विश्वकर्मावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारचा हा मेकअप आर्टिस्ट आपल्या बाईकवरुन एका मित्राला सोडायला निघाला होता. दरम्यान त्याच्या बाईकला बिबट्याने धडक दिली. यामुळे तो खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला होता. त्याला आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या लोकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. परंतु आपण खाली कोसळल्यानंतर नेमकं काय घडलं याचबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याचं त्याने म्हटलं आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

(हे वाचा: Akshay Kumar: अक्षय कुमारने भारताच्या नकाशाबाबत केली मोठी चूक; थेट गृहमंत्रालयात पोहोचलं प्रकरण)

इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, मेकअप आर्टिस्टने या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, 'मी माझ्या बाईकवरुन एका मित्राला सोडण्यासाठी निघालो होतो. तेव्हा ही घटना घडली. हे सगळं सेटपासून अवघ्या काही अंतरावरच घडलं. मी जात असताना पाहिलं की एक डुक्कर रस्त्यावरुन जोरात पळत आहे. मी थोडं निरखून पहिल्यानंतर समजलं की त्याच्या मागे एक बिबट्या धावत आहे.

मी समोर येताच बिबट्या माझ्या बाईकला धडकला. मी जोरात खाली आपटलो. मी पडल्यानंतर बिबट्या माझ्या भोवती फिरत होता. त्यांनतर मी बेशुद्ध झालो त्यामुळे पुढे काय घडलं याची मला काहीच कल्पना नाही. बहुतेक त्याठिकाणी पोहोचलेल्या काही लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं असावं.प्रोडक्शन हाऊसकडून आपल्या उपचाराची जबाबदारी घेण्यात आल्याचंही त्याने सांगितलं.

दरम्यान ऑल इंडिया सिने वर्कर्सचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत या घटनेकडे गंभीरतेने लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे. कारण त्यांच्या मते याठिकाणी अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे फिल्म सिटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत घेऊन येजा करावं लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar, Bollywood News, Entertainment