या महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार

या महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार

सामना झाल्यानंतर हरलेल्या संघाला धीर देण्यासाठी अक्षय त्यांच्या भेटीला गेला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांना म्हटले.

  • Share this:

24 जुलै : काल झालेल्या महिला विश्वकप स्पर्धेत जरी भारतीय महिला टीमचा पराभव झाला असला तरी या महिला संघाने भारतीयांची मनं मात्र जिंकलीयत. काल झालेला सामना अटीतटीचा ठरला मात्र विश्वविक्रमाचा किताब इंग्लंडच्या पदरात पडलाय. भारतीय संघाचा पराभव झाला असली तरी सोशल मीडियावर महिला संघाला जोरदार पाठिंबा मिळालाय.

तुम्ही पराभवानंतरही जिंकला आहात, अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. ही मॅच बघण्यासाठी अक्षय कुमार देखील लॉर्ड्सला गेला होता.यावेळी सामना झाल्यानंतर हरलेल्या संघाला धीर देण्यासाठी अक्षय त्यांच्या भेटीला गेला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांना म्हटले.

याबाबत त्याने एक फोटो देखील सोशल मीडियावर टाकला आहे.तुटलेली मनं देखील हसू शकतात,या महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय, असं अक्षय कुमार याने ट्विटरवर ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे.

First published: July 24, 2017, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading