VIDEO : अक्षय कुमार कसलं करतोय सेलिब्रेशन?

VIDEO : अक्षय कुमार कसलं करतोय सेलिब्रेशन?

बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतोय. अक्की नेहमीच सोशल मीडियावर कार्यरत असतो. मग इन्स्ट्राग्राम असो, वा ट्विटर.

  • Share this:

मुंबई, 8 आॅगस्ट : बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतोय. अक्की नेहमीच सोशल मीडियावर कार्यरत असतो. मग इन्स्ट्राग्राम असो, वा ट्विटर. पण आता तो इतका का खूश आहे? त्यानं इन्स्ट्रावर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तो आनंदानं नाचतो. नक्की कारण काय असावं याचं?

अक्कीचे फॅन्स तर भरपूर आहेत. म्हणूनच अक्षयचा प्रत्येक सिनेमा हा एखादा गंभीर विषयाचा असला तरी बाॅक्स आॅफिस गाजवतोच. तर आता एक चांगली गोष्ट घडलीय. अक्षय कुमारचे इन्स्ट्राग्रामवर 2 कोटींच्या वर फॅन्स झालेत. तो म्हणतो, ' मला कळत नाही की मी कसलं सेलिब्रेशन करतोय. आपला परिवार आता 2 कोटींच्या वर गेलाय. माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.'

अक्षय कुमारचा 'गोल्ड' सिनेमा 15 आॅगस्टला रिलीज होतोय. अक्षय कुमार यात दमदार भूमिकेत दिसतोय. तो बंगाली देशभक्त आहे. या सिनेमात अक्षय हाॅकी कोचच्या भूमिकेत आहे. त्याला आॅलिम्पिकला भारताची हाॅकी टीम खेळवायचीय. आणि ब्रिटिश खेळाडूंना हरवून गोल्ड जिंकायचंय.

हेही वाचा

Tuza Maza Breakup : मीरा कोणाची होणार? समीरची की रजनीशची?

'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये डुप्लिकेट गुरू, राधिकाही अचंबित!

अक्षयनं काही दिवसांपूर्वी चुंबक हा मराठी सिनेमा प्रस्तुत केला होता. 'चुंबक' या मराठीत मुख्य भूमिका लेखक, गीतकार स्वानंद किरकिरे यांनी साकारलीय. त्यांच्यासोबत काही नवोदित कलाकार आहेत. सिनेमाच्या टीमने काही दिवसांपूर्वी हा सिनेमा अक्षय कुमारला दाखवला. त्यानंतर हा सिनेमा त्याच्या डोक्यातून काही केल्या जाऊ शकला नाही. त्यामुळे अखेर त्याने हा सिनेमा प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतला.

एक छोटा मुलगा, ज्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडतो. तो त्याला कसा परत मिळतो, यावरच हा सिनेमा आहे.या सिनेमामुळे अक्षय कुमारचे नाव परत एकदा मराठी सिनेसृष्टीशी जोडलं गेलंय. 2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मिती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत. म्हणजे अगदी 5 वर्षांनंतर अक्षय कुमार पुन्हा मराठी सिनेमाशी जोडलाय.

First published: August 8, 2018, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading