अक्षय कुमारचा खुलासा, 'एक काळ होता निर्माते माझ्याकडे फक्त...'

अक्षय कुमारचा खुलासा, 'एक काळ होता निर्माते माझ्याकडे फक्त...'

अक्षय कुमारचा गुड न्यूज चित्रपट 27 डिसेंबर रोजी प्रेक्षकांची भेटीला येत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याचा येणाऱ्या गुड न्यूज चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत करिना कपूर, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ स्क्रीन शेअर करत आहेत. हा सिनेमा थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाला पुरस्कार मिळाला. अक्षय कुमारने मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याचा करिअरबाबात मोठा खुलासा केला आहे. अक्षयने सांगितलेल्या या गोष्टीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मी थोडा भूमिकांबाबत लोभी आहे. जितक्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका करायला मिळाव्यात यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असतो. सुरुवातीच्या काळात मला फक्त अॅक्शन फिल्मसाठी ऑफर केलं जात होतं. खरंतर एकच गोष्टी पुन्हा पुन्हा करणं मजेशीर असतं कारण त्यातही काहीतरी आपल्याला नवीन सापडत असतं. मात्र मला एकच गोष्ट सतत करण्याचा कंटाळा येतो. सुरुवातील मी फक्त अॅक्शन फिल्म करत होतो. त्यामुळे दिग्दर्शकही मला अॅक्शन फिल्मसाठीच विचारत होते. मात्र माझी ही ओळख बदलण्याची संधी मला हेरा फेरी चित्रपटाने दिली. त्यानंतर माझ्या करिअरला एक मोठी कलाटणी मिळाली.

वाचा-‘हा’ मराठमोळा अभिनेता होणार अरुण गवळीचा जावई! साखरपुडा उरकला

अॅक्शन सिनेमांसोबत कॉमेडी, रिअल, बायोग्राफी अशा वेगळ्या धाटणीचे चित्रपट करायला सुरुवात केली. त्यातून मला आनंद मिळत गेला. जेवढ्या वेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळते तेवढा जास्त आनंद आणि समाधान मिळतं असं एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारने सांगितलं आहे. अक्षय कुमारचा हा किस्सा ऐकून त्याचे चाहते भारवून गेले आहेत. अक्षय कुमार सतत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत असल्यानं लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये त्याचा कामाची चर्चा असते. अक्षयच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट हेरा फेरी चित्रपट ठरल्याचं तो सांगतो.

सध्या अक्षय कुमार आपल्या गुड न्यूज य़ा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारसोबत करिना कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'गुड न्यूज' हा चित्रपट दोन विवाहित दाम्पत्याची स्टोरी असून ते आयव्हीएफच्या माध्यमातून आईवडील होण्याचा निर्णय घेतात. पण आडनावं सारखी असल्याने अक्षय आणि दिलजीतच्या पात्रांच्या स्पर्मची अदलाबदली होती. त्यातून उडणारा गोंधळ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाचा-रालियाच्या नात्यात ‘ती’ची एंट्री? बहिणीच्या बेस्टफ्रेंडशी वाढतेय रणबीरची जवळीक

Published by: Kranti Kanetkar
First published: December 24, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading