Home /News /entertainment /

Akshay Kumar ने खरेदी केलं आलिशान घर! किंमत वाचून वाटेल आश्चर्य

Akshay Kumar ने खरेदी केलं आलिशान घर! किंमत वाचून वाटेल आश्चर्य

अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच आलिशान घर (Akshay Kumar new home) खरेदी केलं आहे.

  मुंबई, 25 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)   खिलाडी अक्षय कुमार   (Akshay Kumar)   आपल्या हटके अंदाजामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर अनेकांना पसंत पडतो. चाहते नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.त्यामुळेच आज आपण अभिनेत्याच्या आयुष्यात आलेल्या एका आनंदाच्या बातमीवर नजर टाकणार आहोत. अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच आलिशान घर   (Akshay Kumar new home)  खरेदी केलं आहे. अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच मायानगरी मुंबईमध्ये आपल्या हक्काचं दुसरं घर खरेदी केलं आहे. याआधीही अक्षय एका आलिशान घराचा मालक आहे. आता त्याच्या संपत्तीत आणखी एका घराची भर पडली आहे. अक्षय कुमार वर्षात दोन तीन चित्रपट सहजच करतो. त्याच्याकडे अनेक प्रोजेक्टस असतात. त्याचं मानधनसुद्धा तितकंच असतं. शिवाय तो अनेक जाहिरातींमध्ये झळकतो. त्यामुळे अभिनेत्याची प्रचंड कमाई आहे. त्यामुळेच अक्षय कुमारने मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलं आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या नव्या घराची किंमत तब्बल 7.8 कोटी इतकी आहे. खरं तर हा एक आलिशान फ्लॅट आहे. अक्षयने हा फ्लॅट खार ईस्टमध्ये जॉय लिजेंड अपार्टमेंटच्या 19 व्या मजल्यावर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर इथे अभिनेत्याला आपल्या गाड्या पार्क करण्यासाठीसुद्धा फारच मोकळी जागा उपलब्ध झाली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  पहिल्या घराची आठवण आहे खास- अभिनेता अक्षय कुमार सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याला बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणलं जातं. परंतु हे यश त्याला इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही. यासाठी त्याने अनेक कष्ट उपसले आहेत. ज्यावेळी अक्षय कुमार पहिल्यांदा मुंबईला आला होता. त्यालासुद्धा मुंबईतील आलिशान बंगल्यांसमोर उभं राहून फोटो काढण्याचा  मोह आवरला नव्हता. परंतु एका बंगल्याच्या बाहेर उभं राहून फोटो काढण्यास अक्षयला नकार मिळाला होता. त्याला फोटोसुद्धा घेऊ दिला नव्हता. परंतु यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अभिनेत्याने तोच बंगला खरेदी केला होता. आज अक्षय त्याच बंगल्याचा मालक आहे. त्यांनतर आता अक्षयने हा नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. (हे वाचा:दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा कधी करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा) अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो नुकताच सारा अली खान आणि साऊथ स्टार धनुषसोबत झळकला होता. त्यांनतर अभिनेत्याने आपल्या आगामी सेल्फी चित्रटाची घोषणा केली आहे. त्यात तो पहिल्यांदाच इम्रान हाश्मीसोबत दिसणार आहे. तसेच नुकताच अक्षयने आपल्या बच्चन पांडे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. यात तो क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood, Bollywood actor, Entertainment

  पुढील बातम्या