मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'लग्नाचं आमिष दाखवून 2 वर्ष बलात्कार केला' बेल बॉटम सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टवर अभिनेत्रीचा आरोप

'लग्नाचं आमिष दाखवून 2 वर्ष बलात्कार केला' बेल बॉटम सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टवर अभिनेत्रीचा आरोप

bell bottom

bell bottom

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बेल बॉटम (Bell Bottom) हा सिनेमा प्रदर्शनाआधीच एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 30 नोव्हेंबर: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बेल बॉटम (Bell Bottom) सिनेमा प्रदर्शनाआधीच एका वेगळ्याच कारणामुळे वादात सापडला आहे. एका अभिनेत्रीने बेलबॉटम सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला आहे. आयुष तिवारी असं या कास्टिंग डायरेक्टरचं नाव आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेत. या अभिनेत्रीने आयुष सोबतच त्याचा रुममेट राकेश शर्माविरोधातही लैगिंक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.

25 नोव्हेंबर रोजी ही तक्रार पोलीस  दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुषची सध्या चौकशी सुरू आहे. पण त्याला अटक करण्यात आलेली नाही. तक्रार दाखल करणारी महिलादेखील अभिनेत्रीच असून तिने काही वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अक्षय कुमारचा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आला सापडला आहे.

अभिनेत्रीचे आरोप

पीडित तरुणीचा आरोप आहे की, ‘आयुष तिवारीने मला लग्नाचं खोटं आमिष दाखवलं. माझ्याशी खोटं बोलत राहिला. खोटी वचनं देऊन त्याने माझ्यावर 2 वर्ष बलात्कार केला. मी त्याचा जवळचा मित्र आणि रुम मेट राकेश शर्माला याबाबत माहिती दिली तेव्हा त्यानेही माझ्यावर जबरदस्ती केली.’ याप्रकरणी आयुष तिवारी आणि त्याच्या मित्राला शिक्षा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याप्रकरणी कलम 376 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अक्षय कुमारचा बेलबॉटम हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. अशातच ही घटना समोर आली आहे. त्याचा परिणाम चित्रपटावर होणार नाही ना? अशी काळजी चित्रपटाच्या टीमच्या मनात आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबतच हुमा कुरेशी, लारा दत्ता, वाणी कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood