मुंबई, १० सप्टेंबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मोठ्या कठीण वेळेतून जात आहे. दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या आईचं निधन झालं होत. आणि आज त्याला शूटिंगसाठी युकेला(UK) परत जावं लागलं आहे. अक्षय युकेमध्ये आपल्या 'सिन्ड्रेला' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. मात्र आईची प्रकृती खालावल्यानं त्याला मुंबईला परत यावं लागलं होत. मात्र दुर्दैवानं त्याच्या आईचं निधन झालं.
View this post on Instagram
गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजनसृष्टीत दुःखद घटना ऐकायला मिळाल्या आहेत. नुकताच बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay kumar) आईचं निधन झालं आहे. अभिनेत्यानं स्वतः ट्वीट करुन ही बातमी सगळ्यांना दिली होती. अक्षयच्या आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं होत.
(हे वाचा:कंगना रणौतच्या चिंतेत वाढ; 'थलाइवी' पहिल्याच दिवशी ऑनलाइन LEAK)
आज अक्षयला यूकेला परत जावं लागलं आहे. अक्षय युकेमध्ये आपल्या 'सिन्ड्रेला' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या आईची प्रकृती स्थिर नसल्यानं त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केलं होतं. हि माहिती अक्षयला समजताच तो तात्काळ शूटिंग सोडून मुंबईला पोहोचला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी आई अरुणा भाटिया यांनी जगाचा निरोप घेतला.
(हे वाचा:सिद्धार्थच्या जाण्याने ग्लूकोजवर आहे शेहनाज? पहिल्यांदाच सत्य आलं समोर)
आज अक्षय मुंबईच्या एका प्रायव्हेट एयरपोर्टवरून युकेसाठी रवाना झाला आहे.cविरल भयानीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. मात्र यावेळी अक्षयने आपल्या कुटुंबाला एकटं न सोडता सर्वांना आपल्यासोबत घेऊन जाणं ठीक समजलं आहे. अक्षयसोबतच सर्व कुटुंबीय सध्या दुःखात जात आहे. त्यामुळे अक्षयने आपल्या कुटुंबालासुद्धा युकेला नेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood News