अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात, निरमाच्या जाहिरातीवरुन शिवप्रेमींनी केली ‘धुलाई’

अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात, निरमाच्या जाहिरातीवरुन शिवप्रेमींनी केली ‘धुलाई’

या जाहिरातीवरुन शिवप्रेमी भडकले असून ही जाहिरात तत्काळ बंद करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : अभिनेता अक्षय कुमार त्याचा फिटनेस आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. एकीकडे काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याचा गुड न्यूज हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे अक्षय कुमार मात्र निरमा वॉशिंग पावडरच्या जाहिरातीवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निरमाची ही जाहिरात करुन अक्षयनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. नव्या जाहिरातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याप्रकरणी अक्षय कुमारनं माफी मागावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे.

निरमा वॉशिंग पावडरच्या नव्या जाहिरातीत अक्षय कुमार मराठा मावळ्यांच्या वेशात दिसत आहे. निरमा वॉशिंग पावडरच्या या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन दरबारात परतलेले दाखवण्यात आले आहेत. त्यावेळी सुवासिनी त्यांचे औक्षण करतात. त्यानंतर अक्षय कुमार युद्धाचा विजयोत्सव साजरा करण्याची घोषणा करतो. पण याचवेळी एक महिला त्यांच्या युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांबद्दल बोलताना दिसते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. ज्यानंतर अक्षय कुमार म्हणतो, ‘महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!’ आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत.

लग्नानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट, नवऱ्याचं तिसरं लग्न आणि दोन मुलांचा बाप

या जाहिरातीत दाखवण्यात आलेला हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा असून ही जाहिरात तत्काळ बंद करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. या जाहिराती विषयी त्यांनी लिहिलं, ‘अरे 'छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी' रक्त सांडून स्वराज्याचा इतिहास लिहिलाय...! त्याची जाण ठेवा. महाराष्ट्रात तत्काळ जाहिरात बंद झाली पाहिजे. सिने अभिनेते अक्षय कुमार, 'निरमा' वॉशिंग पावडर चे मालक व कंपनी आणि आयुष लिमिटेड ही जाहिरात कंपनी यांच्यावर 'राष्ट्रपुरुष' यांची बदनामी केल्याप्रकरणी, मावळ्यांची बदनामी केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा.’

कंगाना रणौतचा दीपिकाला जाहीर पाठिंबा, ट्विटरवरून ‘छपाक’ला दिल्या शुभेच्छा

हे प्रकरण आता एवढं विकोपाला गेलं आहे की, मुंबईमध्ये अक्षय कुमारच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या जाहिरातीतून अक्षयनं मराठ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तसेच ही जाहिरात तत्काळ बंद न केल्यास याच्या विरोधात आंदोलन छेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान यावर अक्षय कुमार किंवा जाहिरात निर्मात्यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

निकसोबत डिनरला गेलेल्या प्रियांकाला ड्रेसनं दिला दगा, 5 लाखांच्या बॅगनं वाचवलं

Published by: Megha Jethe
First published: January 8, 2020, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading