अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी

अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी

आता रिपोर्टर व्हायचं म्हटल्यावर प्रश्न तर विचारावेच लागतील ना... मग काय प्रश्न विचारण्यासाठी त्याने चक्क पंतप्रधानांचीच मुलाखत घ्यायचं ठरवलं.

  • Share this:

नवी दिल्ली, २४ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार काही वेळासाठी अभिनेत्याच्या भूमिकेतून रिपोर्टरच्या भूमिकेत शिरला होता. आता रिपोर्टर व्हायचं म्हटल्यावर प्रश्न तर विचारावेच लागतील ना... मग काय प्रश्न विचारण्यासाठी त्याने चक्क पंतप्रधानांचीच मुलाखत घ्यायचं ठरवलं. यावेळी खिलाडी कुमारने असा काही प्रश्न विचारला की तो ऐकून पंतप्रधान मोदी जोरजोरात हसायला लागले. अक्षयने मोदींना विचारले की, ‘तुम्ही आंबे खाता का?’ हा ‘आम’ प्रश्न ऐकून पंतप्रधान मोदी हसायला लागले. यानंतर अक्षयने त्यांना एक किस्सा ऐकवला. अक्षयनंतर मोदींनीही त्याला आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली.

लग्नाआधीच गरोदर राहिली गर्लफ्रेंड, अर्जुन रामपालने दिली ही प्रतिक्रिया

यावेळी अक्षय मोदींना म्हणाला की, जसा मी माझ्या कुटुंबासोबत राहतो. माझी आई माझ्यासोबत राहते तसं तुम्हाला तुमच्या आईसोबत भावासोबत संपूर्ण कुटुंबासोबत राहावसं वाटत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना मोदी म्हणाले की, ‘मी फार लहान असताना कुटुंब सोडलं. माझी आई तर मला म्हणते की माझ्या मागे वेळ कशाला वाया घालवतोस.’ यानंतर अक्षयने त्यांना कमी झोपण्याचं गुपित सांगायची विनंती केली.

अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया

अक्षय कुमारसोबतच्या या मुलाखतीत मोदींचं हे वेगळं रुप लोकांना पसंत पडलं. लोकसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भाषणांवरून सध्या मोदी साऱ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधत आहेत. सध्या ते निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत तर अक्षयही त्याच्या आगामी सिनेमांच्या चित्रीकरणात गुंतला आहे. लवकरच तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफही झळकणार आहे.

लोकसभा निवडणूक 2019- उर्मिला मातोंडकरच्या मदतीला धावून आली शबाना आझमी, असा केला प्रचार

अक्षय आणि कतरिनाने आतापर्यंत ‘हमको दिवाना कर गये’, ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’ आणि ‘दे दना दन’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. आतापर्यंत प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री आवडली असून आता आगामी सिनेमांमध्येही ही हिट जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. सिनेसृष्टीत कतरिनाची जोडी जेवढी सलमान खानसोबत हिट आहे तेवढीच पसंती अक्षय- कतरिनाच्या जोडीलाही आहे.

First published: April 24, 2019, 9:58 AM IST

ताज्या बातम्या