खिलाडी अक्षय कुमारला मुंबईच्या पावसाचा असा बसला फटका

खिलाडी अक्षय कुमारला मुंबईच्या पावसाचा असा बसला फटका

मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर बॉलिवूड कलाकारांनाही बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 जून : मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. सर्व रस्त्यांवर पाणी साचलं असून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा फटका मुंबईच्या विमान सेवेलाही बसला आहे. मुंबई विमान तळावरून अनेक उड्डाणंही रद्द करण्यात आली. मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर बॉलिवूड कलाकारांनाही बसला आहे. अनेकांना त्यांच्या फ्लाइट्स रद्द झाल्यानं प्लानमध्ये बदल करून घरी परतावं लागलं.

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं घडवून आणली होती सारा-कार्तिकची पहिली भेट

 

View this post on Instagram

 

#akshaykumar with baby Nitara ❤ and #twinklekhanna leave for London for holidays. #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

कालच्या रात्री (1 जुलै) अभिनेता अक्षय कुमार सोबत काहीसम असंच घडलं. काल रात्री अक्षय पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. अक्षय त्याच्या फॅमिलीसोबत व्हेकेशनसाठी लंडनला रवाना होत होता. मात्र मुसळधार पावसामुळे त्याला त्याच्या प्लान बदलावा लागला. त्याची फ्लाइट रद्द झाल्यानं अक्षयला घरी परतावं लागलं.

दिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण

ट्विंकल खन्नानं सोशल मीडियावर ट्वीट करुन याची माहिती दिली. तिनं लिहिलं, ‘काल रात्री एका कॅप्टनसाठी एक विमान चालवण्यापेक्षा जहाजाचं शिड सांभाळणं सोपं होतं. उड्डाण रद्द झालं, रनवेवर बरंच पाणी साचलं होतं आणि आम्ही घरी परतलो. #DisableAirplaneMode.’

काल मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फक्त अक्षय कुमारलाच नाही तर इतर अनेक बॉलिवूड सेलेब्सना बसला. अभिनेत्री राकुल प्रीत सुद्धा एअरपोर्टवर अडकून पडली होती. तिनं याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. तिनं लिहिलं, ‘काल रात्री पासून एकही फ्लाइट नाही. मी एअरपोर्टवर अडकले आहे.’ तर अभिनेत्री सोनम कपूरनंही ट्विटरवरून ‘कोणी मला सांगू शकता का की, मुंबई एअरपोर्ट चालू आहे का?’ यावर राकुलनं सोनमला तिच्या ट्विटरवरून रिप्लाय दिला होता.

पावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी!

============================================================

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या