'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेला अक्षयची हजेरी

'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेला अक्षयची हजेरी

अक्की लवकरच 'बिग बॉस'च्या फिनालेला हजेरी लावणारे. 14 जानेवारीला हा ग्रँड फिनाले आहे.

  • Share this:

10 जानेवारी : गेल्या बऱ्याच दिवसांपासून खिलाडी अक्षय कुमार आणि दबंग खान सलमान खान यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. पण आता या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. अक्की लवकरच 'बिग बॉस'च्या फिनालेला हजेरी लावणारे. 14 जानेवारीला हा ग्रँड फिनाले आहे.

अक्षय त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये सलमानसोबत मजा-मस्ती करताना दिसेल. सोबत सोनमही आहे. अर्थातच पॅडमॅनचं प्रमोशन करायला दोघं एकत्र येणार आहेत.सलमान आणि अक्षयनं मुझसे शादी करोगी सिनेमात एकत्र काम केलंय. त्यामुळे अक्कीची एन्ट्रीच हे गाणं म्हणत होणार आहे.

आता कारण काहीही असो,  सलमान-अक्षय एकत्र येणार म्हटल्यावर दोघांमधले मतभेद संपल्याचीच ही चिन्हं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 05:53 PM IST

ताज्या बातम्या