अक्षय कुमार आणि रवीना टंडन येणार आमने सामने

अक्षय कुमार आणि रवीना टंडन येणार आमने सामने

आता 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये दोघं जज म्हणून एकत्र असतील.

  • Share this:

31 मे : अक्षय कुमार आणि रवीना टंडन एकत्र येणार आहेत. बसला ना धक्का? कारण दोघांचं अफेअर तुटून बरीच वर्ष झाली असली, तरी दोघांना एकत्र आणण्याची हिंमत कुठल्याच निर्मात्यानं दाखवली नव्हती. पण आता 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये दोघं जज म्हणून एकत्र असतील.

या शोमध्ये अक्षय कुमार सुपरबाॅस असेल. त्यात तीन जजेस असतील. त्यात रवीना टंडन असण्याची शक्यता दाट आहे.

90च्या दशकात अक्षय आणि रवीनाची जोडी हाॅट होती. अगदी आॅन स्क्रीन आणि आॅफ स्क्रीनही. दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आणि अक्षयच्या आयुष्यात शिल्पा शेट्टी आली. साहजिकच रवीनाला ही बेवफाई कशी सहन होणार? तिनं अक्षयशी ब्रेकअप केलं. त्यानंतर रवीनानं एनेक मासिकांना दिलेल्या मुलाखतीत आपण किती दुखावले गेलोय, हे उघडपणे सांगितलं होतं.

आता दोघंही आपापल्या आयुष्यात सुखी आहेत. पण तरीही आतापर्यंत दोघंही एकमेकांना टाळतच होते. आता 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहायला आवडेल.

याआधी अक्कीनं ' डेअर टु डान्स' आणि 'खतरों के खिलाडी' शोज् केलेत. रवीना सध्या सबसे बड़ा कलाकार शो जज करतेय.

First published: May 31, 2017, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading