2.0 ट्रेलर : खिलाडी अक्षयचा 'क्रो मॅन' पडणार रजनीच्या 'रोबो'ला भारी?

2.0 ट्रेलर : खिलाडी अक्षयचा 'क्रो मॅन' पडणार रजनीच्या 'रोबो'ला भारी?

सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षयकुमार यांचा 2.0 चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झालंय. रजनीच्या रोबोचा हा सीक्वेल असल्याचं सांगितलं जातंय. अभिनेता अक्षयने साकारलेली 'क्रॉ मॅनची' खलनायकी व्यक्तिरेखा अफलातून. अक्षय यात ओळखूच येत नाहीये. आता प्रश्न आहे रजनीच्या रोबोला खिलाडी अक्षय भारी पडणार का?

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षयकुमार यांचा 2.0 या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाला आहे. सुपरस्टार रजनीकांतच्या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहात असतात. आता रोबोनंतर रजनीकडे साय-फाय सिनेमाचा स्टार म्हणून पण पाहिलं जातंय. महिन्याभरापासून चर्चेत असलेला 2.0 हा चित्रपट 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपटात वापरले जाणारे व्हीएफक्स अतिशय कमाल आहेत. त्याचबरोबर टेक्नोलॉजीमुळे होणारे परिणाम यावर हा चित्रपट अवलंबून आहे. रजनीकांतच्या रोबो चित्रपटाचा सिक्वेल असल्यानं यात अॅक्शन आणि अशक्यप्राय स्टंट पाहायला मिळणार आहेत. धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरनं या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलं आहे.


चित्रपटात स्वत:च स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध  खिलाडी अक्षयकुमार पहिल्यांदा 3D सिनेमामध्ये काम करत आहे. अभिनेता अक्षयने साकारलेली 'क्रॉ मॅनची' खलनायकी व्यक्तिरेखा अफलातून दिसतेय. अक्षय यात ओळखूच येत नाहीये. अक्षयच्या 3D अॅक्शनला पाहण्यासाठी प्रेक्षक जास्त उत्साही आहेत. हॉलिवूडमध्ये वापरले जाणारे VFX बॉलिवूडमध्ये वापरात आणले जात आहे. भारतातील आत्तापर्यंतच्या 3D आणि अॅनिमेटेड चित्रपटांपैकी 2.0 हा सगळ्यात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे.
2.0 सिनेमात रजनीकांत, अक्षयसोबत एमी जॅक्सन सुधांशू पांडे, रियाज खान आणि ऐश्वर्या राय बच्चनसुद्धा असणार आहे. सिनेमाचं संगीत ए आर रेहमान यांनी केलं आहे. 29 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2018 02:41 PM IST

ताज्या बातम्या