पंतप्रधान मोदींच्या ट्विटला अक्षय कुमारचं खास शैलीत उत्तर, म्हणाला...

पंतप्रधान मोदींच्या ट्विटला अक्षय कुमारचं खास शैलीत उत्तर, म्हणाला...

पंतप्रधान मोदींनी 'थोडा जोर लावा आणि मतदानाला एक सुपररहिट कथा बनवा' असं आवाहन बॉलिवूडकरांना होतं.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवार 13 मार्चला बॉलिवूड सेलिब्रेटींना टॅग करत एक ट्विट केलं होतं. मोदींनी करण जोहर, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांना मतदानाचं महत्त्व सांगत लोकशाहीच्या या पर्वात सामील होण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या या ट्विटला बॉलिवूडकरांचा बराच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वांनीच या मोहिमेत सहभागी होऊन मतदान अधिकाराचा वापर करण्याचं आवाहन आम्ही करू अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या.

पंतप्रधान मोदींनी 'थोडा जोर लावा आणि मतदानाला एक सुपररहिट कथा बनवा' असं ट्विट करत बॉलिवूडकरांना टॅग केलं होतं. यावर अभिनेता अक्षय कुमारनं खास शैलीत आपली प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर देताना अक्षयनं लिहिलं, 'मतदानाच्या प्रक्रियेला देश आणि देशाच्या नागरिकांमधील एक सुपरहिट प्रेमकथा व्हावंच लागेल. हे एका चांगल्या लोकशाहीचं प्रतीक आहे.'

आम्ही नक्कीच या मोहिमेत सहभागी होऊ असं ए. आर. रहमाननं लिहिलं.

अभिनेता आमिर खाननंही मोदींच्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली, 'एकदम बरोबर सर, चला भारताचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूयात.' असं आमिरनं म्हटलं.

याशिवाय निर्माता करण जोहरनंही मोदींच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आम्ही मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असं लिहिलं आहे.

First published: March 14, 2019, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading