अक्षय कुमारने शेअर केलेला ४६ सेकंदचा हा टीजर फारच इंटरेस्टिंग आहे. टीजरची सुरुवात अक्षय कुमारपासून होते. यामध्ये अक्षय एक वाद्य वाजवताना दिसून येत आहे. त्यांनतर बाईकवरून इम्रान हाश्मीची एन्ट्री होते. यामध्ये हे दोघेही बस डेपोसमोर असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या आजूबाजूला बस उभ्या आहेत. शिवाय हे दोघे 'सेल्फी' या टायटल सॉन्गवर ग्रुप डान्स करताना दिसून येत आहेत. टीजर पाहून चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच चाहते इम्रान आणि अक्षयला एकत्र पाहण्यासाठी फारच उत्सुक दिसून येत आहेत. (हे वाचा: शहनाज गिलनं केलं नवं PHOTOSHOOT! अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ) काही वेळेपूर्वी अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन पोस्ट शेअर केल्या होत्या.पहिल्या पोस्टमध्ये अक्षयने आपला फोटो शेअर केला होता. यामध्येअक्षय गोल्डन कलरच्या जॅकेटमध्ये सनग्लासेस लावून सेल्फी घेताना दिसत होता. त्यांनतर अक्षयने आणखी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो अभिनेता इम्रान हाश्मीसोबत सेल्फी घेत होता. या फोटोमध्ये दोघांनी आपली बाईक रोडवर थांबवून सेल्फी घेतली होती. 'सेल्फी' या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. तर करण जोहर, अपूर्वा मेहता, अरुणा भाटिया, सुप्रिया मेनन, पृथ्वीराज सुकुमारन, लिस्टीन स्टिफन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood News, Entertainment