भूमी का मारतेय अक्षयला?

भूमी का मारतेय अक्षयला?

गंमत अशी की अक्षय कुमारही तिचा मार हसत हसत खातोय आणि म्हणतोय 'गोरी तू लठ मार'.

  • Share this:

12 जुलै : 'दम लगा के हैश्या'मधून लोकांची मनं जिंकणारी भूमी पेडणेकर अक्षय कुमारला मारतेय. तेही साधंसुधं मारणं नाही तर काठीने मारतेय. गंमत अशी की अक्षय कुमारही तिचा मार हसत हसत खातोय आणि म्हणतोय 'गोरी तू लठ मार'.

घाबरू नका ! अक्षय काही वेडाबिडा झालेला नाही. अक्षय कुमारच्या टॉयलेट सिनेमाचं नवीन गाणं आलंय. या गाण्यात अक्षय आणि भूमी होळी खेळत आहेत. एकामेकांना रंगही लावत आहेत. भूमी अक्षयवर रूसली आहे. म्हणून भूमी अक्षयला लाठीनं मारतेय. तिला मनवायला हा प्रेमाचा मार तो आनंदानं सहनही करतोय. हे सुरेल गाणं गायलंय सोनू निगम आणि पलक मुच्छलने. हे गाणं ट्विट करताना अक्षय म्हणतो 'केशव और जया की प्रेम कहानी में क्यू आ गयी लाठी'.

स्वच्छ भारत मिशनवर आधारित असलेल्या 'टॉयलेट:एक प्रेम कथा' या चित्रपटातलं हे तिसरं गाणं आहे. हा सिनेमा 11 आॅगस्टला थिएटर्समध्ये झळकणार आहे.

First published: July 12, 2017, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading