मुंबई, 11 मे- अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या सिनेमातून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. नुकताच तिचा बेबी बंप दाखवतानाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीसाठी काढला होता. या मुलाखतीत तिने आपल्या आई होण्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अक्षय आणि जॉनसोबत ‘देसी बॉइज’ गाण्यात झळकलेली ब्रुना अब्दुल्लाह आहे. ब्रुना गरोदर असल्याचं कळताच बॉलिवूडमधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. ब्रुनाचं अजून लग्न झालेलं नसून हे तिचं पहिलं बाळ आहे.
आपल्या सावत्र आईपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे 'ही' अभिनेत्री
या ब्राझिलियन अभिनेत्रीने गेल्यावर्षी स्कॉटिश प्रियकराशी १९ जुलैला साखरपुडा केला. ब्रुना आता पाच महिन्यांची गरोदर आहे. लग्नाआधी गरोदर राहण्याबद्दल बोलताना ब्रुना म्हणाली की, ‘लोकांना जोडून ठेवण्यासाठी लग्नाचा कागद पुरेसा पडत नाही. लग्नानंतरही अनेक जोडपी घटस्फोट घेतात. तर काही नात्याला नाव न देताही आनंदी राहतात.’
VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला
ब्रुनाच्या मते, ‘कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यात प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेम हीच एकमेव गोष्ट आहे जी दोन लोकांना बांधून ठेवते.’ यावेळी तिने आपल्या प्रकृतीबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली. तिने सांगितलं की, बाळ सुदृढ आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होत आहे. जेव्हा मी माझ्या प्रेग्नेंसीबद्दल घरी सांगितलं तेव्हा सर्वच फार आनंदी होते. असं म्हटलं जातंय की ब्रूना लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहे.
मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री
ब्रूना ही ब्राझिलियन मॉडेल आहे आणि तिने अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. याशिवाय ब्रूनाने आय हेट लव्ह स्टोरी, ग्रँड मस्ती, मस्तीजादे आणि कॅशसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिए सीझन ६’ आणि ‘कॉमेडी क्लासेस’ अशा अनेक रिअलिटी शोमध्येही काम केलं आहे.
'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग
SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?