Home /News /entertainment /

सोलापूरचा अक्षय इंडीकर करण जोहरसोबत गिरवणार दिग्दर्शनाचा धडा, FB पोस्ट करत म्हणाला....

सोलापूरचा अक्षय इंडीकर करण जोहरसोबत गिरवणार दिग्दर्शनाचा धडा, FB पोस्ट करत म्हणाला....

सोलापूरचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर ( akshay indika ) याने करण जोहरला फेसबुक पोस्ट करत वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्याने करण जोहरसोबत काम करणार असल्याची माहिती देखील सर्वांसोबत शेअर केली आहे.

  मुंबई, 26 मे- प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने काल ( Karan Johar birthday )आपला 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मुंबईतील अंधेरी येथे स्थित यशराज फिल्म्समध्ये करण जोहरने वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. या बर्थडे पार्टीमध्ये जवळजवळ सर्व मोठ्या बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली होती. काहींनी पार्टीला हजेरी लावत करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर काहींनी सोशल मीडियाचा आधार घेत करणला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांकडून तर करणवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. या सगळ्यात सोलापूरचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर  ( akshay indika ) याने देखील करण जोहरला फेसबुक पोस्ट करत वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्याने करण जोहरसोबत काम करणार असल्याची माहिती देखील सर्वांसोबत शेअर केली आहे. सध्या अक्षय इंडीकरची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे, करण जोहरच्याच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षयनं म्हटलं आहे की, ''ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो लहानपणापासून ‘कुछ कुछ होता है’ अगणित वेळा बघितला होता. देशातल्या एवढ्या मोठ्या बॉलिवूड नामक प्रकरणाचा खरा बादशहा जर कोण असेल तर तो हा माणूस. मला कधीच वाटलं न्हवतं मी करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शन सोबत काम करेल आणि हे स्वप्न पण बघण्याचं काही कारण न्हवतं. पण काही स्वप्नं आपल्या नकळत आपण मनाशी बाळगत असतो.''
  ''स्वतः दिगदर्शक असलेल्या स्वतःच्या कंपनीत शेकडो नव्या फिल्ममेकरला संधी देणारा हा माणूस अनेक तरुण फिल्म मेकरला उभं करतोय. आज करण जोहरचा वाढदिवस. आमची पहिली भेट त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पार्टीत होईल असं वाटलं न्हवतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करण जोहर सर.'' ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ अशा अत्यंत वेगळ्या अशा मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करत सोलापूरच्या अक्षय इंडीकर यानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अक्षयच्या कामाची चर्चा, त्याच्या कामाची दखल घेत त्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलं. आता अक्षय बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनसाठी काम करण्याची संधी अक्षयला मिळाली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Karan Johar, Marathi entertainment

  पुढील बातम्या