मुंबई, 2 डिसेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दीक जोशीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. हे बहुप्रतिक्षित लग्न अखेर पार पडलं आहे. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्याही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकप्रिय जोडी अखेर लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राणा दा, पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफ कपल झालं आहे. दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. आज 2 डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडले आहेत. यावेळी अक्षया आणि हार्दीकचा शाही अंदाज पहायला मिळाला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा विवाह खूप चर्चेत होता. लग्न समांरंभातीसल प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर धुमाकूल घालत होती.
View this post on Instagram
अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत असतात. सध्या त्या दोघांच्या लग्नाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या लोकप्रिय जोडीवर सध्या खूप सारं प्रेम, आशिर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांनीही अगदी थाटा-माटात लग्नसोहळा केला आहे. सजावटीपासून परिधान केलेल्या कपड्यांपर्यंत सगळंच शाही अंदाजात पार केलं. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील हिट ठरलेल्या जोडीने साखरपुडा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
झी मराठीवरील गाजलेली मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीने तर सगळ्यांचीच मने जिंकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Wedding