Home /News /entertainment /

PHOTOS: अंकिता-विकीची लगीनघाई! लग्नाआधीच्या विधींना झाली सुरुवात

PHOTOS: अंकिता-विकीची लगीनघाई! लग्नाआधीच्या विधींना झाली सुरुवात

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही लवकरच लग्नाची (Wedding) तारीख जाहीर करतील असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. पण आज अंकिताने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. आज सकाळी तिने तिच्या नवरदेवासोबतचा स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिचे खूप अभिनंदन करत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 डिसेंबर-   अंकिता लोखंडे   (Ankita Lokhande)  आणि विकी जैन   (Vicky Jain)  सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही लवकरच लग्नाची   (Wedding)  तारीख जाहीर करतील असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. पण आज अंकिताने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. आज सकाळी तिने तिच्या नवरदेवासोबतचा स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिचे खूप अभिनंदन करत आहेत. वास्तविक, फोटोमध्ये अंकिता आणि विकी दोघेही मुंडावळ्या बांधलेले दिसत आहेत . जे लग्नाच्या दिवशीच वधू-वरांना बांधले जातात. 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंतच्या प्रवासात तिला लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. अंकिता आज तिचा बॉयफ्रेंड विकी जैनची वधू होणार असून, या खास नात्याला एक नवीन नाव देणार आहे. प्री-वेडिंग सेलिब्रेशननंतर अंकिताने आज एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.तिने पोस्ट शेअर करत लिहिले - 'पवित्र'. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहून दोघेही खूप आनंदी असल्याचं दिसत आहे. अंकिता आणि विकी या दोघांच्याही डोक्यावर मुंडावळ्या बांधलेले दिसत आहे. दोघेही मराठी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत.मुंडावळच्या विधीनंतरच मंगलाष्टके होतील. यानंतर जयमलाचा विधी पूर्ण होईल आणि त्यानंतर विकी अंकिताला मंगळसूत्र बांधेल. यानंतर सप्तपदी म्हणजेच अग्नीला साक्षी मानून दोघेही ७ फेरे घेतील आणि त्यानंतर निरोप समारंभ होईल. विकी जैननेही दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फटोंमध्ये फक्त तो एकटा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो अंकिता लोखंडेसोबत दिसत आहे. विकी जैनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी आमच्यावर प्रेम करतो पण पिक्चर अभि बाकी हे माझा मित्र.' सेलेब्ससोबतच चाहतेही विकी आणि अंकिताच्या या फोटोंचे अभिनंदन करत आहेत. २०१८ पासून आहे सोबत- 'पवित्र रिश्ता' दरम्यान अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत एकमेकांच्या जवळ आले होते. वर्षानुवर्षे त्यांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. पण जवळपास 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. 2018 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील जवळीक वाढली. 2019 मध्ये अंकिता लोखंडेने देखील सोशल मीडियावर त्यांचे नाते अधिकृत केले होते. तेव्हापासून विकी आणि अंकिता चाहत्यांना कपल गोल देत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ankita lokhande, Entertainment

    पुढील बातम्या