आर्चीच्या प्रेमातला गावरान परश्या बदलला, मेकओव्हरनंतरचा नवा लुक पाहिला का?

आर्चीच्या प्रेमातला गावरान परश्या बदलला, मेकओव्हरनंतरचा नवा लुक पाहिला का?

पदार्पणाच्या सिनेमात गावरान अवतारात असलेला आकाश आता मात्र पूर्णपणे वेगळा दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : काही वर्षांपूर्वी आलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमानं मराठी सिने सृष्टीतील बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि अवघ्या काही दिवसातच 100 कोटीचा गल्ला पार केला. या सिनेमातील प्रमुख कलाकार आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी सर्वांनाच वेड लावलं होतं. या सिनेमानंतर हे दोघंही स्टार झाले आणि त्यांचा मेकओव्हर झाला. सुरुवातीला आर्चीनं मेकओव्हर केल्यानंतर आता परशा म्हणजेच आकाश ठोसरचाही नवा लुक समोर आला आहे.

आकाशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. पदार्पणाच्या सिनेमात गावरान अवतारात असलेला आकाश आता मात्र पूर्णपणे वेगळा दिसत आहे. डोक्यवर हॅट, गळ्यात मफलर अशा कूल लुकमध्ये आकाशचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

😇😇

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

सैराट सिनेमानंतर आकाशनं  महेश मांजरेकर यांच्या ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही मात्र आकाशच्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर त्यानं ‘लस्ट स्टोरीज’या नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्येही काम केलं.

आकाशच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच तो नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.  हा सिनेमा येत्या 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सैराटनंतर नागराज मंजुळे-आकाश ठोसर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

==========================================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

First Published: Oct 24, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading