मुंबई 1 मे: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं औधषं, लसी, ऑक्सिजन आणि आता तर रक्ताचाही तुटवडा जाणवू लागला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत मदतीचा पुढे करण्यासाठी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यानं रक्तदान केलं आहे. शिवाय त्यानं इन्स्टाग्रामवर रक्तदान करतानाचा एक फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. सैराटमधील परश्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
पाहूया या पोस्टमध्ये काय म्हणाला आकाश?
आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की देशासाठी काहीतरी करावं,उपयोगी पडावं. मला लहानपणी पोलीस किंवा आर्मी मध्ये भरती होऊन देशसेवा करायची होती पण ते शक्य झालं नाही. आज कोरोनाच्या लढयात वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक आपल्यासाठी झटत आहेत, ते देशसेवाच करत आहेत..
मग आपल्यालाही काय करता येईल ?
कोरोना मुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रक्ताचाही तुटवडा भासतोय. 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या काळात 18 वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. पण एकदा लस घेतल्यानंतर पुढील 60 दिवस म्हणजेच दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करणं गरजेचं आहे.
कसं केलं जातं तरुणींचं शोषण?; ईशा अग्रवालनं केली बॉलिवूडची पोलखोल
कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान आणि बाकीच्यांनी रक्तदान..
सगळ्यांना आवाहन करूयातच पण आता सर्वात आधी आपल्या स्वतःलाच आवाहन करणं गरजेचं आहे..म्हणजे मग एक साखळी तयार होईल. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर एकमेकांना प्रेरणा मिळावी हा शुद्ध हेतू ठेऊयात.
एकमेकांना मदत करून,जमेल तसा एकमेकांना आधार देऊन आपलं ' रक्ताचं ' नातं अजून घट्ट करूयात..
View this post on Instagram
तीन दिवस लसीकरण बंद
कोरोना प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccine) घेण्यासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा (Covid19 vaccine shortage) जाणवत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण होणार नसल्याची (Vaccination paused in Mumbai) माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Blood donation, Entertainment