श्लोका आणि आकाश अंबानीचं लग्न 9 मार्चला, या खास इव्हेंटने सुरू झाले लग्नाचे समारंभ

या कार्यक्रमात सुमारे १ हजार ६०० पाहुणे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम अंबानी कुटुंबियांच्या घरी अँटेलियामध्ये पार पडला.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 07:12 PM IST

श्लोका आणि आकाश अंबानीचं लग्न 9 मार्चला, या खास इव्हेंटने सुरू झाले लग्नाचे समारंभ

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधी नीता अंबानी यांनी सोमवारी ४ मार्चला एक खासगी संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात सुमारे १ हजार ६०० पाहुणे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम अंबानी कुटुंबियांच्या घरी अँटेलियामध्ये पार पडला.

या कार्यक्रमात विशेष म्युझिक कॉन्सर्ट होता. यानंतर डिनरची सोयही करण्यात आली होती. या खास पार्टीसाठी अँटेलियाला फुलांनी सजवण्यात आलं होतं. तसेच सर्व पाहुणे भारतीय पेहरावात आले होते.

डायमंड मर्चेंट रसेल मेहताच्या मुलीशी अर्थात श्लोकाशी आकाश लग्न करत आहे. येत्या ९ मार्चला दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. हे लग्न वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होईल. आकाशची वरात ट्रायडंट, बीकेसीवरून दुपारी ३.३० वाजता निघेल.

Loading...

९ तारखेला लग्न झाल्यानंतर ११ मार्चला राजेशाही थाटात रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मोठं सेलिब्रेशन होणार आहे. यात अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.

काही दिवसांपूर्वी इशा अंबानीच्या लग्नातही बॉलिवूडच्या अनेक तारकांनी हजेरी लावली होती. शाहरुख खानपासून आमिर आणि अमिताभ बच्चनपर्यंत अनेकांना या लग्नाला हजेरी लावली होती.

 मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 6 मार्च रोजी धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

यावेळी नीता अंबानी यांनी बेबी पिंक रंगाचा ड्रेस घातला होता.

नीता अंबानी नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत होत्या. सध्या त्यांच्या या ड्रेसची इंटरनेटवर खूप चर्चा सुरू आहे.

यावेळी वेगवेगळ्या एनजीओच्या मुलांना जेवण दिलं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी स्वत:च्या हातानं या मुलांना वाढलं.

यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी या मुलांशी गप्पा मारल्या.

त्यांना भेटून सर्व मुलंही खूप खूश झाली होती.

या कार्यक्रमात आकाश आणि श्लोका यांनीही भाग घेतला.

आकाश आणि श्लोका लवकरच लग्नबंधनात बांधले जाणार आहेत.

नीता अंबानी यांच्या सुंदर ड्रेसची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...