Home /News /entertainment /

AK Vs Indian Air Force: त्या वादग्रस्त दृश्यासाठी अनिल कपूर यांनी मागितली माफी; म्हणाले...

AK Vs Indian Air Force: त्या वादग्रस्त दृश्यासाठी अनिल कपूर यांनी मागितली माफी; म्हणाले...

त्या आक्षेपार्ह दृश्याबद्दल अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी भारतीय वायुसेनेची (Indian Air Force) माफी मागितली आहे.

    मुंबई, 09 डिसेंबर: अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा सिनेमा AK Vs AK प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच या सिनेमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला. यामध्ये अनिल कपूर भारतीय वायु सेनेच्या गणवेशात दिसत आहेत आणि हा गणवेश घालून ते चुकीच्या पद्धतीने संभाषण करताना दिसत आहेत. त्यामुळे वायुसेनेने या दृश्यांवर आक्षेप घेतला होता. अशाप्रकारच्या सीन्समुळे वायु सेनेचा अपमान होतो असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा सीन चित्रपटामधून काढून टाकावा अशी मागणी वायु सेनेनं (Indian Air Force)  केली होती. त्याला अनिल कपूर यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाले अनिल कपूर? “AK Vs AK या चित्रपटामध्ये मी एका वायु सेनेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. माझ्या पात्राची मुलगी हरवलेली आहे. त्यामुळे गोंधळलेला बाप जसा वागेल तशीच प्रतिक्रिया मी दिली आहे. पण माझ्या काही वाक्यांमुळे जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. मला आणी माझ्या पूर्ण टीमला भारतीय वायुसेनेबद्दल नितांत आदर आहे. कोणाचा अपमान करण्याच्या हेतूने तो सीन शूट केलेला नव्हता.” या शब्दात अनिल कपूर यांनी ट्वीटरवरुन भारतीय वायुसेनेची माफी मागितली आहे. या चित्रपटातील प्रोमोमध्ये असं दिसून येत आहे की, अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरचं अपहरण झालेलं आहे. आणि अनुरागने अनिल कपूरला फक्त दहा तासांचा अवधी दिलेला असतो. या दहा तासांमध्ये अनिल कपूरला आपल्या मुलीला शोधायचं असतं. आता सोनमचा शोध लागतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या फिल्ममध्ये अनिल कपूर, अनुराग कश्यप, सोनम कपूरसह (Sonam Kapoor) बोनी कपूर यांनीही काम केलं आहे. या फिल्मचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने यांनी केलं आहे. त्यांनी यापूर्वी  2018मध्ये प्रदर्शित झालेला ‘भावेश जोशी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. AK vs AK हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Netflix

    पुढील बातम्या