• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • आदिराज आणि मीरा यांच्यामध्ये आलेली ही तिसरी व्यक्ती कोण?

आदिराज आणि मीरा यांच्यामध्ये आलेली ही तिसरी व्यक्ती कोण?

‘अजूनही बरसात आहे’ (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत लवकरच आदिराज आणि मीरा लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र या लग्नामध्ये एक ट्विस्ट असा की, यावेळीच या दोघांच्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री (Priya Bapat) झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 नोव्हेंबर- ‘अजूनही बरसात आहे’ (Ajun hi Barsat Ahe ) या मालिकेतून (Marathi serial) अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta barve) ही जोडी प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. मालिकेतील दोघांमध्ये सतत वाद तर कधी प्रेम पाहायला मिळत असतो. या दोघांनी एकत्र यावे, लवकर लग्नगाठ बांधावी अशीच चाहत्यांची इच्छा होती. आणि आज ही इच्छा पूर्ण होणार आहे कारण ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेत लवकरच आदिराज आणि मीरा लग्नगाठ बांधणार आहेत. अनेक दिवसांपासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता होती. आज अखेर मालिकेत हे क्षण पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये मीरा फारच आनंदी दिसून येत आहे. मीरा आणि आदिराजला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. मात्र या लग्नामध्ये एक ट्विस्ट असा की, यावेळीच या दोघांच्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री (Priya Bapat) झाली आहे. ही तिसरी व्यक्ती कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वाचा : अबोली मालिकेत अतुल आगलावे साकारणार 'गुंजनराव' ; पाहायला मिळणार कोल्हापुरी बाज सोनी मराठीने या तिसऱ्या व्यक्तीसोबत या दोघांचा फोटो शेअर केला आहे. यावर नेटकऱ्याने देखील अंदाज लावला आहे. कमेंट करून सांगितली आहे की, ही तिसरी व्यक्ती प्रिया बापट आहे. पाटमोरा फोटो पाहून अनेकांनी हा अंदाज लावला आहे. आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे येणाऱ्या भागातच समजणार आहे.
  मीरा आणि आदिराज यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत. सुरुवातीला प्रेम, रिलेशनशिप नंतर ब्रेकअप आणि नंतर पुन्हा एकदा पॅचअप असा यांचा प्रवास आहे. एकेमकांपासून वेगळे होऊन देखील त्यांच्या मनात एकेमकांबद्दल प्रेम तसंच होतं. आणि म्हणूनच नशिबाच्या साथीने आज हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. एकमेकांच्या सोबतीने मीरा आणि आदिराज आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. मालिकेतील हा नवा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर झाले आहेत. मुक्त आणि उमेशची जोडी प्रचंड पसंत केली जात आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: